आरोग्य विषयकमहाराष्ट्र

आष्टी तालुक्यातील खडकी गावामध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात, ग्रामसेवक नादाराद, डॉक्टर गैरहजर. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, लोकप्रतीनीधी लक्ष घातली काय?

(प्रतिनीधी, आशीष वाघ)

            आष्टी,दि,२९:- तालुक्यातील खडकी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन दुषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने लहान बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे तत्परतेने लक्ष दिले नाही तर जिवीत हाणी सुध्दा झाल्या शिवाय राहणार नाही अशी नागरिकांची तक्रार असुन त्यांनी  जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे तक्रार सुध्दा दाखल केली आहे तर, लोकप्रतीनीधीनी सुध्दा यात लक्ष घालावे अशी त्यांची अपेक्षा आहे.

 खोलगट भागातील वॉल मध्ये जमा झालेले दुषीत पाणी

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असुन साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात खडकी ग्रामपंचायतीच्या गलथन कारभारामुळे गावकऱ्यांना दुषीत व घाणयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातुन बांधण्यात आलेल्या टाकीमधुन गावकऱ्यांना पाण्याचे वितरण केल्या जाते. सुरळीत पणे पाण्याचे वितरण व्हावा या करीता ठिकठिकाणी वॉल लावले आहे. मात्र हे वॉल खोलगट भागात लावले असल्याने व सातत्याने लिकेज होत असल्याने यात दुषीत व घाणयुक्त पाण्याचा शिरकाव होवुन तो नागरिकांपर्यंत पोहचतो. याची देखरेख करणे याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे, मात्र ग्रामसेवकच लोकांच्या नजरेस पडत नसल्याने नाईलाजाने नागरिकांना याच दुषीत व घाणयुक्त पाण्याचा उपयोग करावा लागत आहे. परिणामी लहान बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन साथीच्या रोगांना बळी पडत आहे. गावात म्हणायला प्राथमीक आरोग्य केंद्र आहे, आरोग्यअधिकाऱ्याची नियुक्ती सुध्दा आहे मात्र ते सुध्दा नियमीत हजर राहत नसल्याने नागरिकांना तालुक्याच्या खाजगी डॉक्टर कडे धाव घ्यावी लागते. परिणामी एखादेवेळी नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांनी याची जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे ऑलाईन पोर्टल व्दारे मेल पाठवुन तक्रार सुध्दा केली आहे. आणी बेजबाबदारीने वागण्याऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच याकडे लोक प्रतीनीधीने सुध्दा लक्ष घालावे अशी मागणी आहे.

               पुरवठा करणाऱ्या पाणी टाकीजवळ घाणीचे साम्राज्य         

तक्रार करुन सुध्दा कुणीच लक्ष दिले नाही – संदीप नागपुरे

            माझी लहान मुले आहेत मी बरेचदा ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी व स्थानीक राजकीय नेत्यांकडे गढळु व घाणयुक्त पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याची तक्रार केली मात्र कुणीही याची दखल घेतली नाही व उत्तर सुध्दा दिले नाही. परिणामी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे तक्रार केली असुन ते काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे अशी माहिती संदिप नागपुरे यांनी दिली.

मेल्यानंतरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येईल – नारायण नागपुरे

नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. मात्र याकडे ग्रामसेवकाचे लक्ष नाही. त्यांना गावातील नागरीक साथीच्या रोगाला बळी पडला काय आणी मेला काय याच काही देणेघेणे नाही. दुषीत व घाणयुक्त पाण्याने मेल्यानंतरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येईल काय? असा प्रश्न नारायण नागपुरेे यांचा आहे.

एका एका वॉलचे काम करणार – ग्रामसेवक नरेंद गुलगाने

            नागरीकांना सुरळीत पाणी मिळावे याकरीता बसवीलेले वॉल खोलगट भागात असल्यामुळे जमा होणारे पाणी त्यात शिरुन शुध्द पाण्यासोबत दुषीत व घाण युक्त पाण्याचे वितरण होत असल्याची कबुली ग्रामसेवक नरेंद्र गलगाने यांनी देवुन एकदम संपुर्ण गावाचा पाणी पुरवठा बंद न करता एका एका भागाचे व्हॉल तातडीने दुरस्त करण्यात येईल अशी माहिती दिली.

           

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button