मोजक्या सुशीक्षीत बेरोजगार गरिब व्यवसायीकांच्या दुकानावर चालले बुलडोजर
बगीच्या व बचतगटाच्या व्यवसायाकरीता नियोजीत जागा खाली? ***व्यवसायीकांनी दिले मुख्याधिकारी यांना निवेदन***व्यवसायाकरीता पर्यायी जागा द्या! मागणी***अटलबिहारी बगीच्या ओस पडला मग कशाला पाहिजे पुन्हा बगीचा

आर्वी,दि.७:- नगर परिषदेने गुरूवारी (ता.सात) अतिक्रमण हटाव पथक व पोलीसांचा जमावडा सोबत घेवुन अतिक्रमण हटाव मोहीम राबवीली. मात्र यात मोजक्याच सुशीक्षीत बेरोजगार गरीब व्यवसायीकांच्या दुकानावर बुलडोजर चालवील्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
विधानसभा क्षेत्रात कुठलाही उध्योग नसल्याने सुशीक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम नाही तर, दुसरीकडे बांधकामाचे कंत्राट सुध्दा बाहेर गावातील बड्या कंत्राटदारांना दिल्या जात आहे. परिणामी शहरातील हात मजुरी करणाऱ्या कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे. यातुन मार्ग काढण्याकरीता त्यांनी संवैधानीक मार्गाने व्यवसाय करण्याचा मार्ग स्वीकारला. रस्त्याच्याकडेला पान टपरी, चहा टपरी, भेलगाडी, भाजीपाला आदिंची दुकाने लावुन व्यवसाय सुरू केला. काही सुशीक्षीत बेरोजगारांनी राखी सणाच्या निमीत्ताने राखी विकण्याचा व्यवसाय नुकताच सुरू केला. मात्र यावर सुध्दा नगर परिषदेची वक्रदृष्टी पडली.

गुरुवारी (ता.सात) दुपारी ११ वाजता मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांच्या नेतृत्वात पोलीस जमावड्याला सोबत घेवुन नगर परिषदेचा ताफा अतिक्रमण काढण्याकरीता निघाला. व्यवसायीक चिंतेत पडले. जुण्या न्यायालय चौकातील चहा टपरी, फुल, फळ आदि पाच सहा व्यवसायीकावर बुलडोझर चालले. त्यानंतर हा ताफा जुण्या मटन मार्केटकडे वळला येथील टिनशेड, हॉटेल काढले आणी अतिक्रमण मोहीम थंडावली. मात्र यामुळे इतर व्यवसायीकांना मात्र दिलासा मिळा
बगीच्या व बचतगटाच्या व्यवसायाकरीता नियोजीत जागा खाली?
न्यायालय चौकातील जुण्या चंगीकर नाक्या लगतच्या त्रिकोणी जागेवर नगर परिषदेच्यावतीने बगीच्या बाधण्यात येणार असुन जुण्या मटन मार्केटची खाली जागा बचतगटाला व्यवसायाकरीता देवुन त्यांच्याकडूनच आधुनीक स्वच्छालयाची देखरेख करण्यात येणार असल्याचे बोलल्या जात आहे या करीताच अतिक्रमण हटाव मोहिमेच्या माध्यमातुन जागा खाली करुन घेतल्याची चर्चा आहे.

व्यवसायीकांनी दिले मुख्याधिकारी यांना निवेदन
शहरातील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेच्यावतीने ध्वनीक्षेपकावरुन गत आठ दिवसापासुन देण्यात येत होते. सणावाराच्या दिवसापुढे व्यवसायावर गाज पडणार या चिंततेत असलेल्या महामार्ग लगतच्या व्यवसायीकांनी गुरूवारी (ता.सात) मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांना समाजसेवक रामु राठी यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत नगर परिषद हद्दीमधीलच अतिक्रमण काढणार असल्याची माहिती त्यांनी दिल्याने दिलासा मिळाला.
व्यवसायाकरीता पर्यायी जागा द्या! मागणी
गुरूवारी (ता.सात) राबवीलेल्या अतिक्रमण मोहीमे अंतर्गत चहा टपरी, पान टपरी, फळ दुकान, फुल दुकान, हॉटेल आदि अवध्या मोजक्याच दुकानांवर बुलडोझर चालल्याने सनावाराच्या दिवसापुढे त्यांचेवर उपासमारीची पाळी आली आहे. याच व्यवसायावर त्यांच्या परिवाराचे उदरभरण चालते. याचा विचार करुन नगर परिषदेने व्यवसाया करीता पर्यायी जागा द्यावी अशी मागणी आहे.

अटलबिहारी बगीच्या ओस पडला मग कशाला पाहिजे पुन्हा बगीचा
शहरातील एकमेव माजी पंतप्रधान अटल बिहारी बगीच्यावर नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च केले. त्याचे सौदर्यीकरण केले. लहान मुलांकरीता खेळ वस्तु व व्यायामाचे साहित्य लावले मात्र याचेच संरक्षण करु शकले नाही. बगीच्यामधील खेळ साहित्य तुटून अस्तव्यस्त पडले आहे. फुल झाडे आदिंची दुरावस्था आहे. नागरीकांनी व मुलांनी सुध्दा याकडे पाठ फिरवीली आहे. माजी स्व. पंतप्रधान अटलबिहारी बाजपेय यांच्या नावावर मोठ्या अभिमानने निर्माण केलेल्या, नगर परिषद लगत व मध्यभागी असलेल्या एकमेव बगीच्याचे योग्य पध्दीने व्यवस्थापन करण्यात नगर परिषद कमी पडली तिथे अजुन एक बगीच्या कशाला? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.



