*** नगर पालीका निवडणुकीत शांत बसलेल्या मुस्लीम समाजाची भुमीका महत्वाची ठरणार***
***समाजसेवेक महेफुज कुरेशी राहणार केंद्रस्थानी***

आर्वी,दि.३०:- नगर पालीकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप पक्षाची उमेदवारी मिळविण्याकरीता पंचेविसच्यावर स्वंयभू समाजसेवक महिलानी अर्ज दाखल केले असले तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर शांत बसलेल्या मुस्लीम समाजाची भुमीकाच महत्वाची ठरणार असुन या माध्यमातून समाजसेवक महेफुज कुरेशी हेच केंद्रस्थानी राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
नगर परिषदेचे नगराध्यक्षपद महिला करीता राखीव झाल्यानंतर अनेकांचे चेहरे काही काळा करीता काळवटले मात्र यातुनही सावरण्याकरीता त्यांनी आपआपल्या बायकोला पुढे करण्याचा चांगलाच सपाटा लावला आहे. नगर परिषद निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याचे अपेक्षीत असुन यांनी बायकोला पुढे करुन नगराध्यक्षाची उमेदवारी मिळवीण्याकरीता आटापिटा सुरू केला आहे. नवऱ्याच्या भरवश्यावर स्वत:च स्वत:ला समासेवीकेची पदवी प्रदान करुन समाज माध्यमाच्या सहाय्याने प्रसिध्दीच्या झोतात येण्याचे प्रयत्न बहुत:श महिलाचा सुरू आहे. मात्र त्यांच्या दृष्टीने नगण्य ठरलेल्या सुमारे सहा हजार मतांचा गठ्ठा असलेला मुस्लीम समाजाची भुमीका महत्वाची ठरणार आहे.
गत १९७६-७७ च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा इतीहास जर डोळ्यापुढे आणला तर अपक्ष उभ्या असलेल्या वजीरभाई यांचा अवघ्या दोनशे पन्नास मतांनीच पराभव झालेला होता. यात सुध्दा साडे तिनशेच्यावर मतदारांनी मतपत्रीकेवरील दोन चिन्हावर मतदान केल्यामुळे त्यांना मिळालेली मते अवैध ठरली आणी डॉक्टर वसंतराव गुल्हाणे हे नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत निवडूण आले हे विसरता येणार नाही.
समाजीक कार्यात सातत्यांने कार्यरत असलेल्या महेफुज कुरेशी यांची मुस्लीम समाजात चांगलीच पकड आहे. गोर-गरीब रुग्ण आणी गरजू लोकांचे ते आधार स्तंभ आहेत. कोणत्याही पदावर नसतांना सुध्दा त्यांनी सामाजीक कार्यात स्वत:ला वाहुन घेतलेले आहे. स्वखर्चाने रुग्णांना मदत करणे, गरीब कुटूंबातील गरजवंतांना अन्नधान्याची मदत करणे, शैक्षणीक कार्यात सहाय्य करणे याशिवाय वेगवेगळे सामाजीक कार्यक्रम राबवुन समाज उन्नतीकरीता प्रयत्न करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आदिंमुळे त्यांची समाज बांधवांच्या मनावर जबरदस्त पकड निर्माण झालेली असुन त्यांच्या शब्दाला मान दिल्या जातो. एवढेच नव्हे तर इतर समाजात सुध्दा त्यांनी चांगली छाप उमटवली आहे. आणी म्हणुच गत निवडणुकीचा अनुभव पाहता होवु घातलेल्या नगर परिषद निवडणुकीत त्यांची भुमीका अनेकांचे अदांज बिघडवीणारी ठरणार आहे. हे राजकीय नेत्यांना विसरुन चालणार नाही.
