पोलीस कारवाई

*** अखेर बहुचर्चीत “मैथेली पालीवाल” फेसबुक अकॉउंटचा कर्ताधर्ता पोलीसांना गवसला *** रोहण हिवाळे यांना उशीरा रात्री केली अटक, परिसरात चर्चेला आले उधाण***

असा लागला पोलीसांना शोध*** पोलीसांनी मारहान केल्याची न्यायाधिशांकडे तक्रार ***

आर्वी, दि.१:- विशीष्ठ शैलीत टिका सत्र चालविल्यामुळे थोड्याच दिवसात बहुचर्चीत झालेल्या “मैथीली पालीवाल” या फेसबुक अकाँउंटचा कर्ताधार्ता आठ महिण्यानंतर पोलीसांना गवसला असुन  संभाजी ब्रिगेडच्या रोहण हिवाळे याला पोलीसांनी शुक्रवारी (ता.३१) उशीरा रात्री अटक केली आहे. यामुळे मात्र परिसरात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

हिच ती वादातीत पोष्ट

वर्षाच्या सुरूवातीला सुरू झालेले “ मैथीली पालीवाल” या नावाचे फेक फेसबुक अकाउंट लोकांच्या नजेरेस पडू लागले. धार्मीक, राजकीय, सामाजीक, श्रध्दा, अंधश्रध्दा, वैय्यक्तीक, एैतीहासीक आदी विषयांवरील विसंगतीवर आपल्या वैशिष्ठपुर्ण भाषेत टिका या माध्यमातुन होत असल्यामुळे अवघ्या काही दिवसातच हे अकांऊट लोकप्रीय ठरले. अशातच येथील प्रसिध्द वैध्यकीय तज्ञ डॉ. अभिलाष धरमठोक यांच्या एम. डी. डिग्रीवर सुध्दा त्यांनी या माध्यमातुन संशय व्यक्त केला. याशिवाय चुकीचे आरोप लावले यामुळे व्‍यथीत झालेल्या डॉ. अभिलाष धरमठोक यांनी फरवरी महिण्याच्या २१ तारखेला तक्रार दाखल करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. याची दखल घेवुन पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द तक्रार दाखल करुन चौकशी सुरू केली. सायबर सेलच्या माध्यमातुन प्राप्त झालेल्या माहितीवरून “ मैथीली पालीवाल” हा फेसबुक अकांऊट रोहण हिवाळे यांनीच क्रीऐट केला असल्याचे सिध्द झाले आणी पोलीसांनी त्याला शुक्रवारी (ता.एक) अटक केली.

हिच ती आक्षेपाहार्य पोष्ट

या प्रकरणी वर्धा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत ढोले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सतीश डेहणकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, वर्धा सायबर सेल व मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तपास कार्य केले. तर, फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा त्यांना मदत केली.

असा लागला पोलीसांना शोध

मैथीली पालीवाल या फेसबुक अंकाऊटची माहिती मिळविण्याकरीता ठाणेदार सतीश डेहणकर यांनी सायबर सेल वर्घा यांच्या सोबत पत्र व्यवहार केला. सायबर सेल वर्घा यांनी महाराष्ट्र सायबर सेल मुंबई यांच्याकडे प्रकरण पाठवीले. त्यांनी फेसबुक अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधुन त्यांना मैथीली पालीवाल जीमेल अकांऊट व आयपी ॲड्रेसची माहिती पाठवीली. हे अकांऊट उघडण्याकरीता जि ओ कंपणीच्या सिमचा वापर केल्याचे निश्पन्न झाले आणी मोबाईल क्रमांक व सिम धारक रोहन चंद्रशेखर हिवाळे यांचे नाव सुध्दा माहित झाले.

पोलीसांनी मारहान केल्याची न्यायाधिशांकडे तक्रार

अटक केल्या नंतर पोलीसांनी शनिवारी (ता.एक) रोहण हिवाळे याला येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयात न्यायाधीश हिंगणघाटे यांच्या समोर हजर केले.  यावेळी पोलीसांनी मारहाण केल्याची तक्रार त्याने केली. याची दखल घेवुन न्यायाधिशांनी वैध्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिल्याचे कळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button