*** गांधी विध्यालयातील एन.सी.सी. छात्र सैनिकांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळा संपन्न ***नवनिर्वाचीत नगराध्यक्षा स्वाती गुल्हाणे यांचा सुध्दा केला सत्कार *** २०२५ च्या बॅचचा लागला १०० टक्के निकाल ***
आर्वी,दि.३०:- गांधी विध्यालयातील एन.सी.सी. च्या २०२५ बॅच मध्ये सर्व विध्यार्थी पास झाले असुन शंभर टक्के निकाल लागला आहे. विध्यालयाच्यावतीने मंगळवारी (ता.३०) यशस्वी विध्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सोबतच नगर परिषदेच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे यांचा सुध्दा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गांधी विध्यालयातील चित्रकला हॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे ह्या होत्या तर, भारतीय सेनेमधील सुभेदार तथा २१ महाराष्ट्र बटालीयन वर्धाचे विनोद कुमार, प्राचार्य विश्र्वेश्वर पायले, पर्यवेक्षीका ज्योती अजमीरे, माजी विध्यार्थी तेजस देशमुख हे प्रमुख अतिथी होते.

या वेळी २०२५ च्या बॅच मधुन अल्फा ग्रेड मिळविणाऱ्या रुद्र सातपुते, हितेश शिरपुरकर, रुद्राक्ष दिघडे, कु. भक्ती रुद्रकार, इशिका मेहरमुरे, बेस्ट फायर अवार्ड मिळवीलेल्या कु. माही आसोले, कु. अरुषी शाहु धावण्याच्या स्पर्धेतील वेदिका गोरले, राष्ट्रीय शिबीरात सहभागी वैष्णवी राऊत, समृध्दी ढेंबरे तसेच सर्व उत्तीर्ण छात्र सैनिकांचा सत्कार करुन त्यांना बक्षीस देण्यात आले.
सोबतच नवनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे यांचा एन.सी.सी. विभागाच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देवुन तर, फोर्स वन कमांडो मुंबई येथे कार्यरत असलेले माजी विध्यार्थ्यी तथा छात्र सैनिक तेजस देशमुख, संत गाडगेबाबा अमरावती विध्यापिठातुन एम.सी.सी. कम्पुटर सायन्स विषयात पाच जिल्ह्यातुन गुणवत्ता यादीत प्रथम स्थान पटकावीणाऱ्या कु. वैष्णवी कैलाश कुऱ्हाडे यांचा सुध्दा यावेळी सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी सुभेदार विनोद कुमार यांनी मार्गदर्शन करतांना, एन.सी.सी चे ट्रेनिंग घेणाऱ्या छात्र सैनिकांना भारतीय सेने मध्ये भविष्यात उपलब्ध असलेल्या संधीची माहिती दिली. तेजस देशमुख यांनी एन.सी.सी. पथकाच्या माध्यमातुन मिळालेल्या अनुभवाची माहिती विषद केली तसेच मेहनत जर केली तर आपण कितीही मोठ्या पदावर जाऊ शकतो असे सांगीतले. याशिवाय पर्यवेक्षीका ज्योती अजमीरे, प्राचार्य विश्र्वेश्र्वर पायले यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
एन.सी.सी. छात्र सैनिकांना सलग दोन वर्ष कठीण परिश्रम करुन बटालीयनच्या माध्यमातुन घेण्यात येणाऱ्या पाचशे मार्काची परिक्षा देवुन हे यश प्राप्त करावे लागते. सन २०२५ मध्ये सर्व विध्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची झ्यालर पसरली होती.
कार्यक्रमाचे संचालन एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक संजय कीटे यांनी मानले.


