***श्रमदानातुन ५०० मिटर स्मशान भुमी पोहच रस्त्याचे बांधकाम***मिर्झापुर (नेरी) येथील नागरीक आले एकत्र *** रात्री दोन तास काम करण्याचा केला निर्धार***
***गुरूवारी (ता.एक) शौर्य दिना निमीत्त मानवंदना व संवीधान जागर रॅली***

आर्वी,दि.२९:- मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत अनेक विकास कामे मार्गी लावणाऱ्या मिर्झापुर (नेरी) येथील ग्राम उत्सव समितीने श्रमदानातुन स्मशान भुमी पोहच रस्ता तयार करण्याच ठरवुन या करीता रात्रीचे दोन तास देण्याच निर्णय घेतला आणी पाहता पाहता ५०० मिटरचा रस्ता तयार झाला. याकरीता सरपंच बाळ सोनटक्के यांनी आवाहन केले होते.
सातत्याने लोक चळवळ राबवुन विकास कामे पुर्ण करण्याकरीता मिर्झापुर (नेरी) येथील ग्रामस्थांचा हातखंडा आहे. यापुर्वी सुध्दा त्यांनी अनेक कामे हाती घेवुन पुर्ण केले. याकरीता राज्य सरकारने गावकऱ्यांचा वेळोवेळी सत्कार करुन विवधी पुरस्कार देवुन सन्मान सुध्दा केला आहे. याच पध्दतीने स्मशान घाट पोहच रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्धार नागरीकांनी केला. उपसरपंच सिध्दार्थ काळपांडे व ग्रामपंचायत सदस्य कामी लागले. नागरिकांनी सुध्दा हाती पावडे टोपले घेतले आणी पाहता पाहता ५०० मिटरच्या खडीकरण मातीकामाचे काम पुर्णत्वास गेले. कडाक्याच्या थंडीचा विचार न करता गुरुवार (ता.२५) पासुन सलग दोन तास गावातील नागरीक यांनी श्रम केल्याची माहिती ग्राम सचिव संजय यावले यांनी दिली.
रोजमजुरी करुन फावल्या वेळेत केले श्रमदान – बाळा सोनटक्के
निम्न वर्धा धरणात शेती गेल्यामुळे गावातील नागरीक रोजमजुरीवर निर्भर आहेत. दिवसभर श्रम करुन थकल्यानंतर सुध्दा नागरिकांनी रात्री दोन तास अतिरीक्त श्रमदान करुन विकास कामाला आनंदाने हात भार लावला. त्यांचा हा उत्साह पाहुन डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात अशी प्रतिक्रीया सरपंच बाळा सोनटक्के यांनी दिली.

गुरूवारी (ता.एक) शौर्य दिना निमीत्त मानवंदना व संवीधान जागर रॅली
आर्वी,दि.२९:-शौर्य दिना निमीत्त पाचशे महार शुरवीरांना मानवंदना देवून संविधान जागर रॅली काढण्याचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा निर्माण व देखरेख समितीच्यावतीने करण्यात आला आहे.
गुरुवारी (ता.एक) सकाळी आठ वाजताचे सुमारास येथील शिवाजी चौकालागतच्या नगर परिषद प्रशासकीय इमारती लगत हा कार्यक्रम होणार असुन परिसरातील नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थीत राहावे असे आवाहन आयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.

