*** आर्वी शहरात घडली थरारक घटना *** मनोरुग्णांने घेतला दोघा वृध्द इसमाचा जीव *** दुचाकी स्वार व लहान मुलाला केली मारहान *** आजीला सुध्दा केली होती मारहान *** पकडणाऱ्या वाहतुक पोलीसाच्या हाताला सुध्दा बसला जबर मार *** डिवचल्यानेच हा प्रकार घडला असल्याची शक्यता ***
*** आणी अस सुरू झाल थरारक नाट्य *** आणी चेकाळला मत्या *** असा केला जेरेबंद *** पोलीस अधिक्षक व सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी दिली भेट *** वाहतुक पोलीस खंडाळे यांनी थांबवीले थरार नाट्य *** ,,,,,,,,, तर दोघांचे ही जिव वाचले असते ***
आर्वी,दि.२१:- सकाळी नऊ वाजताचे सुमारास मन हेलावुन टाकणारे थरारक नाट्य घडले असुन एका चेकाळलेल्या तरुण मनोरुग्णाने दोघा वयोध्दांना लाकडी काठीने मारुन त्यांचा जिव घेतला तर, तत्पुर्वी त्याने आजीचा गळा दाबुन मारहाण केली, एका दुचाकी स्वाराला व लहान मुलाला सुध्दा मारहाण केली. आणी त्याला पकडणाऱ्यां वाहतुक पालीसाच्या हाताला सुध्दा जबर मार बसला आहे. बुधवारी (ता.२१) हि घटना इंदिरा चौकातील भाजी बाजारात घडली.
प्रथमेश गजानन लाडके (२० वर्षे) असे चेकाळलेल्या मनोरुग्णाचे नाव असुन त्याला चिकण्या, मत्या सुध्दा म्हटल्या जात असुन तो नेताजी वार्डातील रहिवासी आहे. तर, रामरावजी महादेव वांगे (८५ वर्ष) राहणार मारोती वार्ड, संजय रामकृष्ण राऊत (७० वर्ष) राहणार हनुमान वार्ड अशी मृतकांची माहिती आहे.

मनोरुग्ण प्रथमेश उर्फ मत्याच घर
आणी अस सुरू झाल थरारक नाट्य
बुधवारी (ता.२१) सकाळी उघड्या नागड्या असलेल्या मत्या उर्फ प्रथमेशला त्याच्या आजीने चांगल राहण्याची समज दिली आणी येथुनच थरार नाटयाची सुरूवात झाली. प्रथमेशने त्यावेळी तीचा गळा दाबुन मारहान केली आणी तशाच नग्न अवस्थेत घरा बाहेर पडला. नेताजी वार्ड व लाकुड बाजारातील रस्त्याने फिरत असतांना त्यांच्या मागे तरुण, लहान मुलांचा जमाव लागला होता. तो पुढे पुढे व जमाव मागेमागे जात होता. आधीच मनोरुग्ण आणी त्यातल्यात्यात मागे लागलेल्या जमावामुळे तो चांगलाच चेकाळला. त्यांने घरचा रस्ता पकडला मात्र त्याच्या मागचा जमाव काही कमी झाला नाही. यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रथमेश उर्फ मत्याने त्याच्या घरालगत दुचाकीवर असलेल्या टिव्हीएस मायक्रो फायन्सस कंपनीच्या कर्मचाऱ्याला दुचाकीवरुन ओढून मारहान केली मात्र दुचाकीस्वाराने स्वत:चा बचाव केल्या मुळे परत फिरला. त्यानंतर त्याच्या तवडीत दहा वर्षाचा करण गणेश शेंडे सापडला. त्याचा गळा दाबुन मारहान करण्याचा प्रयत्न केला. जमावात असलेल्या काही लोकांनी करणला त्याचे तावडीतुन सोडवले आणी लाथा बुक्यांनी चांगलीच मारहान केली.

मत्याला मारहान करतांना लोक
आणी चेकाळला मत्या
या वेळे पर्यंत मनोरुग्ण प्रथमेश उर्फ मत्या चांगलाच चेकाळला. त्याने स्वत:च्या बचावाकरीता घराला लागुन असलेल्या लाकडी बाजीचा दांडा (गाथ) तोडून हातात घेतला आणी मागे लागलेल्या लोकांच्या जमावाला धमकावले. यावेळी त्याने रौद्ररुप धारण केले होते. लोकांचा जमाव पुढेपुढे तर, मत्या लाकडी दांडा घेवुन त्यांच्या मागे असे थरार नाट्य सुरू झाले अशातच गभणे यांच्या घरा जवळ त्याच्या तावडीत वयोवृध्द संजय राऊत सापडले. त्यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जबर मारहान केली. यात डोक्याचा चेंदामेंदा झाला आणी त्यांचा जागीच मृत्यु झाला. यानंतर प्रथमेश उर्फ मत्याने आपला मोर्चा इंदिरा चौकातील भाजी बाजाराकडे वळवीला येथे वयोवृध्द रामरावजी वांगे त्याच्या तावडीत सापडले. त्यांना सुध्दा हातातील काठीने मारहान केली. यात ते जबर जख्मी झाले. त्यांचा मृत्यु रुग्णालयात उपाचार दरम्यान झाला.

हातात काठी घेवुन जमावाला धमकावत असतांना
असा केला जेरेबंद
या वेळे पर्यंत या थरार नाट्याची माहिती पोलीस स्टेशन पर्यंत पोहचली. कर्तव्यावर असलेल्या चोरपगारे यांनी शिवाजी चौकात कर्तव्य बाजावत असलेल्या वाहतुक पोलीस प्रदिप खंडाळे यांना सोबत घेवुन घटनास्थळ गाठले. मनोरुग्ण प्रथमेश उर्फ मत्या याचे थरार नाट्य सुरूच होते. प्रदिप खंडाळे यांनी जिवाची पर्वा न करता त्याची काठी हातावर अडवीली आणी त्याला जमीनीवर पाडून जेरेबंद केले. लोकांच्या मदतीने पोलीस स्टेशन मध्ये नेले. अशा रितीने हे थरार नट्य थांबले.
या प्रकरणी ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात मनोरुग्ण प्रथमेश उर्फ मत्या याचे विरुध्द विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद घेवुन येथील ग्रामीण उपजिल्हा रुगणालयात प्राथमीक उपचार करुन सेवाग्राम येथे पुढील उपचाराकरीता दाखल केले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस नीलम बाबर, पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, जमादार बालाजी मस्के करीत आहे.
पोलीस अधिक्षक व सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी दिली भेट
या थरार नाट्याची माहिती मिळताच वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुपकुमार अग्रवाल व सहाय्यक पोलीस अधीक्षक वाघमारे यांनी तातडी भेट दिली. घटनेची संपुर्ण माहिती घेवुन पुढील तपासा बाबत सुचना दिल्या.
वाहतुक पोलीस खंडाळे यांनी थांबवीले थरार नाट्य
वाहतुक पोलीस शिपाई प्रदिप खंडाळे यांनी घटनास्थळी पोहचताच चेकाळलेल्या प्रथमेश उर्फ मत्याला हातातील काठी फोकण्याचे आवाहन केले मात्र तो त्यांच्याच अंगावर धावला. हातातील काठीने डोक्यावर वार केला मात्र हा वार त्यांनी मोठ्या शिताफीने हातावर झेलला आणी पायाने मारुन त्याला खाली पाडले व ताबा मिळवीला. तमाशगीर बनुन थरार पाहणाऱ्या लोकांनी सुध्दा खंडाळे यांना साथ दिली. परंतु या झकापकीत प्रदिप खंडाळे यांचा हात फ्कॅचर झाला.
,,,,,,,,, तर दोघांचे ही जिव वाचले असते
१० वर्षाच्या करण शेंडे याला प्रथमेश उर्फ मत्याच्या हातातुन काही लोकांनी सोडवीले आणी त्याला लाथा बुक्यांनी मारहान करुन सोडून दिले आणी तो जास्तच चेकाळला. याच वेळी जर लोकांनी त्याला सोडून न देता जेरेबंद केले असते आणी पोलीसांच्या ताब्यात दिले असते तर दोघांचाही जिव वाचला असता.
