महाराष्ट्रशेती विषयक

अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याला केले त्रस्त, लाखो रुपयाचे केले नुकसान गोठ्याला लावली आग, उभी पऱ्हाटी फेकली उपडुन, ओलीताच्या पाईप मध्ये सोडला विधृत प्रवाह आणी आता तर तुरीची गंजीच दिली पेटवुन तक्रार करुन ही पोलीस मात्र गप्पच

*** कॅमेरे लावताच तिसऱ्याच दिवशी गंजीला आग *** अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेतील काय? ***

आर्वी,दि.२५:-अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याला त्रास देवुन त्याचे लाखो रुपयाच्या पिकाचे व मालमत्ते नुकसान केले. आधी जनावरांचा गोठा पेटवीला. त्यानंतर कापसाची झाडे  उपटुन फेकली, ओलीताच्या पाईप मध्ये करंट सोडून मारण्याचा प्रयत्न केला. आता तर तुरीची गंजीच पेटवुन दिली. हा प्रकार गत एक वर्षा पासुन सुरू असुन पोलीसात तक्रार सुध्दा केली मात्र तपास थंड्या बस्त्यात असल्याने कुठे न्याय मागावा हा प्रश्न शेतकऱ्या पुढे निर्माण झाला आहे.

मोरश्र्वर बुले असे त्रस्त शेतकऱ्याचे नाव असुन तळेगाव (शा.पं) येथील ते रहिवाशी आहेत. त्यांचे ममदापुर शिवारात साडे सहा एकर ओलाताचे शेत आहे. अज्ञात व्यक्तीकडून जाणीव पुर्वक त्यांना त्रस्त केल्या जात आहे. याची सुरूवात सुमारे एक वर्षा पुर्वी शेतातील गाई-म्हशीचा गाेठ्याला आग लावण्या पासुन झाली. जनावर गोठ्या बाहेर बांधले असल्याने ती वाचली. काही दिवसानंतर बोंड पकडलेली दोन एकरातील पऱ्हाटी उपडुन टाकली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर, शेतात जिवीत हानी करण्याच्या दृष्टीने पऱ्हाटीच्या पिकात व ओलीता करीता लावलेल्या लोखंडी पाईपाला, लोखंडी बारीक तार जोडून विधृत प्रवाह सोडला. वेळीच लक्षात आल्यामुळे यातुन बुले बचावले. मात्र लाखो रुपयाचे नुकसान सहन करावे लागले.

उपडून फेकलेली पऱ्हाटीची झाडे

कॅमेरे लावताच तिसऱ्याच दिवशी गंजीला आग

        घडलेल्या या प्रकाराची त्यांनी पोलीसात तक्रार सुध्दा केली होती. मात्र, पोलीसांना काही शोध लावता आला नाही. शेवटी त्रस्त झालेल्या बुले यांनी शेतात सिसिटीव्ही कॅमेरे बसवीले. मात्र त्यानंतर तिसऱ्याच दिवशी तुरीच्या गंजीला आग लावुन अज्ञात व्यक्तीने त्यांना एक प्रकारे आवाहनच दिली. यात बुले यांचे २५ ते ३० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.

अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेतील काय?

          गत एक वर्षा पासुन होत असलेल्या घटनेची माहिती तक्रारी मधुन शेतकरी मोरेश्र्वर बुले यांनी पोलीसांना दिली असुन ठाणेदार मंगेश भोयर यांचे मार्गदर्शनात पी. एस. आय. किशोर खंडार, निखिल काळे, अतुल अडसड हे तपास करीत असले तरी, पुढे काही घटना घडायच्या आत अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध लावतील काय? असा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button