निवेदनमहाराष्ट्र

*** डोंगरी, पहाडी भागात मोबाईल रेंज गुल *** शासकीय डिजिटल प्रणाली ठप्प *** ग्रामीण भागातील नागरीक झाले त्रस्त *** टावरची मागणी करुन गोरसेनेने दिला आंदोलनाचा इशारा ***

आर्वी,दि. ९:- तालुक्यातील डोंगरी, पहाडी भागामधील मोबाईल रेज गुल होत असल्‍याने शासकीय डिजिटल्‍ प्रणाली एकदम ठप्प पडीली आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरीक त्रस्त झाले असुन त्यांची मोबाईल टावरची मागणी आहे. याकरीता गोरसेनेचे ज्ञानेश्वर राठोड यांच्या नेतृत्वात आदिवासी एकात्मीक विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे येथील तहसीलदाराच्या माध्यमातुन मागणीचे निवेदन पाठवले असुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

धनोडी (बहाद्दरपुर) सर्कल मधील पाचेगाव, कवाडी, गव्हानखेडी आदि गावे पहाडी व डोंगरी भागात वसलेली आहेत. या गावांमध्ये जास्तीत जास्त आदिवासी बांधव राहत असतात. स्वातंत्र्याच्या ६९ वर्षा नंतर सुध्दा विकासाच्या दृष्टीने मागासलेलीच आहेत. भौतीक सुवीधेंचा अभाव असल्यामुळे या परिसरातील नागरीक प्रगतीपासुन कोसो दुर आहेत. अशातही शासकीय कारभाराचे डिजीटीलायझेशन झाले आहेत. याच माध्यमातुन योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवील्या जाते मात्र या परिसरात मोबाईल रेंज नसल्यामुळे नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ तर मिळतच नाही शिवाय शासकीय कामापासुन सुध्दा वंचीत राहावे लागत आहे.

अंगणवाडीची शासनाने निर्धारित केलेली ऑनलाईन कामे असो, विध्यार्थ्यांची कामे असो, आशा वर्करची कामे असो अथवा स्वस्त धान्य दुकानातुन धान्य वितरणाची कामे आदिंमध्ये अडथळा निर्माण होत असल्याने कामे ठप्प पडली आहे. ऐवढेच नाही तर, या डिजीटल शिक्षण प्रणाली सुध्दा प्रभावीत झाल्यामुळे पहिली ते चौथी पर्यंतचे विध्यार्थी शिक्षणापासुन वंचीत होण्याच्या मार्गावर आहेत. अशी गंभीर परिस्थीती निर्माण झाली असुन यातुन सुटका करण्याकरीता शासनाने त्वरीत मोबाईल टावर उभारावा अशी मागणी गोर सेनेच्यावतीने निवेदन देवुन करण्यात आली आहे.

निवेदन देणाऱ्यांमध्ये, मुकेश दुपारे,  नरेश मरसकोल्हे,  सुमित तिडगाम, अनिल येडमे,  अतुल येडमे,  विनोद राठोड, विजय खडतकार, अक्षय यावले, नितीन खैरकार, रवींद्र  राठोड, प्रकाश राठोड, अजय राठोड, शैलेश तिडगाम, रवींद्र खंडारे, प्रभू श्रीराम, रमेश राठोड, यश तिड़गाम,  शरद आहाके आदिंचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button