महाराष्ट्र

मोकाट कुत्र्यांचा शहरात हौदोस, एकाच दिवशी नऊ लोकांना घेतला चावा नऊ वर्षाच्या मुलाला केले जबर जख्मी, तर वाटसरुंना सुध्दा घेतला चावा प्राणी मित्रांनी मोठ्या शिताफीने त्याच्यावर मिळवीला ताबा

आर्वी,दि.२८:- शहरात मोकाट कुत्र्यांनी चांगलाच हौदोस घातला असुन वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी नऊ लोकांना चावा घेवुन जख्मी केले आहे. यातील एका दहा वर्षाच्या मुलाला तर जबर जख्मी केले असुन त्याचेवर उपाचार सुरू आहे. तर, वाटसरुनां सुध्दा त्याने सोडले नाही. तर दुसरीकडे पर्यावरण बचाव समितीच्या प्राणी मित्रांनी त्याला मोठ्या कष्टाने ताब्यात घेतल्यामुळे दिलासा मिळाला आहे. रवीवारी (ता.२५) हि घटना घडली आहे.

जबर जख्मी झालेल्या मुलाचे नाव धवन गुल्हाणे असुन तो एलआयजी कॉलनी मधील रहिवासी आहे. घरा लगत खेळत असतांना मागाहुन आलेल्या मोकाट कुत्र्याने त्याचा पाय पकडुन खाली पाडले आणी हात, पाया व डोळ्या लगत चावा घेवुन जबर जख्मी केले. याशिवाय सायंकाळी पाच वाजाताच्या सुमारास फिरायला निघालेल्या ताराचंद नेहारे या वाटसरुच्या मागुन त्याचा पाय पकडला. तर, पाचोड (ठाकुर) येथील करण राठोड, नितेश भेंडे यांना सुध्दा त्याच कुत्र्याने चावा घेवुन जख्मी केले.

या घटनेची माहिती मिळताच पर्यावरण बचाव समितीच्या प्राणी मित्रांनी त्याचा शोध घेवुन पकडण्याकरीता टाकलेली जाळी सुध्दा फाडून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु प्राणी मित्रांनी आपला जिव धोक्यात घालुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. हा कुत्रा रेबीज रोगाने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरु आहे.

तर, दुसरी घटना रेल्वे स्टेशन परिसरातील हमाल पुऱ्यात घडली. येथील अतुल मोहोड, प्रेम कुते, ऋृषीकेश दाहिर, रवी दाहीर, नितेश भेंडे यांना सुध्दा कुत्र्याने चावा घेवुन जख्मी केले आहे. जख्मीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन अँटीरेबीजचे लसीकरण करण्यात आले आहे.

कातडीचे रोग व इतर कारणांमुळे सुध्दा कुत्रे रेबीज ग्रस्त होतात

          कातडीचे रोग, चिखळलेली जख्म आदिंवर वेळीच उपचार करुन न घेतल्यास कुत्रे रेबीज ग्रस्त होता. आणी या रेबीज ग्रस्त कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याचा चावा घेतला तर याची लागन होते. याशिवाय ढगाळ वातावरणा मुळे सुध्दा व्हायर इन्फेक्शन होवु शकतो. नागरीकांनी अशा रोग ग्रस्त कुत्र्यांना पडुन आणल्यास त्याचेवर उपचार करुन लसीकरण करण्याची सोय स्थानीक पशु वैध्यकीय रुग्णालयात आहेत अशी माहिती येथील पशु वैध्यकीय अधिकारी डॉ. अस्वर यांनी दिली आहे.

प्राणी मित्रांना, नागरीक व नगर पालीकेच्या सहकार्याची गरज

          येथील पर्यावरण बचाव समितीचे प्राणी मित्र आपल्या जिवाची बाजी लावुन समाज कार्यासोबतच प्राणी बचावाचे काम करतात. अनेक घरातील विषारी साप पकडून त्यांनी सापाचे तर प्राण वाचवीलेच शिवाय नागरिकांचे जिव सुध्दा वाचवीले आहे. २६ जानेवारीला त्यांनी लसीकरण शिबीराचे आयोजन सुध्दा केले होते. त्यांना नागरीकांनी व नगर पालीकेने सहकार्य करणे गरजेचे आहे.

नगर परिषद मोकाट जनावरांवर कारवाई करणार काय?

          शहरात मालकांनी सोडलेल्या मोकाट जनावरांचा चांगलाच हौदोस आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे.  हि जनवारे पकडण्याकरीता यवतमाळ येथील कंपनीला कंत्राट सुध्दा दिला आहे. त्याने जनावारे पकडण्याचा धडाका सुध्दा लावला होते.  मात्र काही नगर सेवकांनी व नगर परिषदेच्या कमचाऱ्यांनीच त्यांना पकडलेले जनावरे सोडायला लावल्याचे बोलल्या जात आहे. तर जनावर मालकांनी त्याला दमदाटी करुन जनावरे नेल्याचे माहिती मिळाली आहे. याची त्याने पोलीसात तक्रार सुध्दा केली आहे. नगर परिषदेने कंत्रादाराला संरक्षण देणे गरजेचे असुन अधिकारी हे करतील काय? असा त्रस्त नागरीकांचा सवाल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button