नेत्र तपासणी व आरोग्य महाशिबीराला प्रचंड प्रतिसाद, नागपुरच्या जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान व राष्ट्रीय युवा संस्थेने केले होते आयोजन एक हजार ५०० शिबीरार्थींनी घेतला लाभ, ३०० रुग्णांना चष्म्याचे वाटप, ५१ वर होणार मोतीया बिंदु शस्त्रक्रीया, ११७ इतर रुग्णांची तपासणी
कारंजा (घाडगे), दि.२४:- नागपुर येथील जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान व राष्ट्रीय युवा संस्थेने आयोजीत केलेल्या नेत्र तपासणी व आरोग्य महाशिबीराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन एक हजार ५०० शिबीरार्थींनी यात सहभाग नोंदवीला. यातील ३०० रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले, मोतीया बिदु शस्त्रक्रिये करीता ५१ रुग्णांना रेफर करण्यात आले. तर, इतर आजाराने पिडीत असलेल्या ११७ रुग्णांची तपासणी करुन औषध वितरण करण्यात आले. स्थानीक स्व. राजीव गांधी मेमोरियल इंग्लिश हायस्कुल मध्ये शनिवारी (ता.२४) आयोजीत केलेल्या या शिबीराचे उद्घाटन आमदार सुमीत वानखेडे यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय युवा उदय संस्थेच्या अध्यक्षा अरुणाताई चाफले ह्या होत्या तर सचिव पियुष चाफले, जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपुरचे सचीव डॉ. राजू मिश्रा, विश्वस्त डॉ. संजय उगेमुगे, डॉ. पंकज कन्नमवार, माजी सरपंच शिरीष भांगे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वंजारी, सुदीप भांगे, हरिभाऊ धोटे, मुख्याध्यापक जनार्दन धोटे, माजी प्राचार्य विलास वानखेडे हे प्रमुख अतिथी होते.

आमदार सुमीत वानखेडे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना, आर्थीक कारणामळे व सुवीधेच्या अभावाने ग्रामीण भागातील नागरीक आरोग्य तपासणी पासुन वंचीत राहत असल्याच सांगुन अशांना या शिबीराच्या माध्यमातुन सेवा देण्याच मोठ काम आयोजकांनी केल आहे अशी प्रसंशा करुन वेगवेगळ्या ठिकाणी शिबीराचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या शिवाय इतर मान्यवरांनी सुध्दा यावेळी समयोच्चीत मार्गदर्शन केले.

या शिबीरात शालीनीता मेघे हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपुरच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची आरोग्य तपासणी करुन शिबीर स्थळावर उपलब्ध असलेल्या औषधीचे मोफत वितरण करण्यात आले. प्रथम येणाऱ्या तिनशे नेत्र रोग शिबीरार्थीना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. या शिवाय आधुनीक आरोग्य यंत्रा व्दारे रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन प्रदिप कुमार उके व निशा धुर्वे यांनी केले तर, आभार रजनी धांदे यांनी मानले.

शिबिराच्या यशस्वीतेकरीता विलास वानखेडे, हरिभाऊ धोटे, शिरिष भांगे, यादवराव भांगे, राजुभाऊ वंजारी, प्रा.जनार्दनजी धोटे, सुदीप भांगे, प्रदीपकुमार ऊके, दिलीप जसुतकर, रजनी धांदे, तसेच स्व. राजीव गांधी मेमोरीयल इंग्लिश हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेज व ए.आर.सी. पब्लिक स्कुलच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिपकुमार उके व निशा धुर्वे यांनी तर आभार प्रदर्शन रजनी धांदे यांनी केले

