निकृष्ठ बांधकाममहाराष्ट्र

निकृष्ट दर्जाच्या नाली बांधकामाची चौकशी करुन कंत्राटदार व अधीकाऱ्यावर कारवाई करा शिवसेना (उबाठा) ची मागणी, नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

आर्वी,दि.३० :- शहराच्या विकासा करीता आलेल्या ५३० कोटी रुपयाच्या माध्यमातुन शहरात होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला तात्पुर्वीती स्थगीती देवुन चौकशी करा आणी जबाबदार कंत्राटदार व अधीकाऱ्यांवर करवाई करा अशी मागणी शिवसेना (उबाठा) ची असुन त्यांनी शुक्रवारी (ता.३०) नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांना निवेदन दिले आहे.

  गत पाच सहा महिण्यापासुन शहरात ५३० कोटी रुपये निधीच्या माध्यमातुन नालीचे बांधकाम केल्या जात आहे. मात्र यात शासनाचे निकष, नियम व अटीचे अजीबात पालन केल्या जात नाही. बांधकामाकरीता वापरल्या जात असलेली साहित्य एकदमच निकृष्ट दर्जाचे आहेत. बांधकामा करीता नैसर्गीक रेती अथवा क्रश केलेली रेती वापरल्या पाहिजे मात्र कंत्राटदार चक्क चुरीचा वापर करीत आहे. याशिवाय खोदकाम सुध्दा निकशा प्रमाणे होत नसल्याने नाली उंच्च आणी घरे खाली अशी अनेक ठिकाणी अवस्था झालेली आहे. परिणामी पावसाचे पाणी अथवा घरातील सांडपाणी नालीने वाहण्या ऐवजी घरात परत येण्याची शक्यता जास्त आहे. नाली बेसच्या दबाई करीता व्हायब्रेड मशीनचा वापर करणे गरजेचे असतांना सुध्दा रंद्यानेच समतल केल्या जात आहे. परिणामी लवकरच तळ आच्छादन फुटून पाणी जमीनीतच मुरण्याची व घाणीचे साम्राज्य पसरण्याची जबरदस्त शक्यता आहे. याशिवाय भविष्यात नाली कोसळुन अपघात सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

करीता नाली बांधकामाची चौकशी तांत्रीक बांधकाम विभागाच्या तज्ञ अधिका-यांच्या माध्यमातुन करण्यात यावी. तो पर्यंत बांधकामाला तात्पुर्ती स्थगीती देण्यात यावी. चौकशी अंती दोषपुर्ण बांधकाम आढळल्यास बांधकाम कंत्राटदार व देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करुन झालेल्या बांधकामाचे पैसु वसुल करण्यात यावे अशी मागणी शिवसेना (उबाठा) ची आहे.

निवेदन देणाऱ्यांमध्ये शिवसेना (उबाठा) चे विधानसभा समन्वयक सनी गौतम, शहर प्रमुख मनीष अरसड, नरेश वडणारे, शैलेश मडामे, अरवींद बोंद्रे रंगाराव शेंडे, महेश कुंभारे आदिंचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button