ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे ७३ वे स्थापना दिन संपन्न आत्माराम राठोड लिखीत “पाणी पेटतंय” पुस्तकाचे झाले विमोचन तर, आर्वीचे माजी नगरसेवक दिलीप जाधव यांची वर्धा जिल्हाध्यक्ष पदी झाली निवड

आर्वी,दि.३१:- ऑल इंडीया बंजारा सेवा संघाचे ७३ वे स्थापन दिन, शुक्रवारी (ता.३०) यवतमाळ येथे संपन्न झाले. या कार्यक्रमात वन विभागाचे जेष्ठ अधिकारी आत्माराम राठोड (ISF) लिखीत “पाणी पेटतंय” या बहुमुल्य पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तर आर्वी येथील माजी नगरसेवक दिलीप जाधव यांची संघाच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री समर्थ प्राईड अँन्ड लॉन यवतमाळ येथे झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. टि. सी. राठोड हे होते. तर, संघाचे राज्यध्यक्ष बापुराव राठोड (लातुर), दिल्लीचे रमेश आर्या, माजी अध्यक्ष राजपाल राठोड, दिगांबर राठोड, उघ्योजक एन.डी.जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबुसींग नाईक, भारत राठोड, आमदारराजेश राठोड, डॉ. मोहन राठोड (यवतमाळ), ॲड. जगदीश पवार, संघाचे सचीव शंकर आडे, प्रा. दिनेश राठोड (बुलढाणा), उपायुक्त धूपचंद राठोड, डॉ. वर्षाताई चव्हाण, अभय चव्हाण (बुलढाणा), गोवर्धन चव्हाण (गडचिरोली) हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
पाण्याची भीषण टंचाईची परिस्थिती विचारात घेऊन लेखक आत्माराम राठोड (IFS) या अधिकाऱ्याने “पाणी पेटतय” या शीर्षकाचे पुस्तक समाज मनाला जागृत करण्याच्या उद्देशाने लिहिलेले आहे. सदर पुस्तकाची प्रस्तावना मुंबई हायकोर्टाचे वकील ॲड. सुधाकर राऊत यांनी लिहिली आहे. तर, मुंबईचे लेखक व निर्देशक सचिन पुराणिक आदिंनी या पुस्तकावर आपले अभिप्राय लिहीले आहे.
या पुस्तकात १९ प्रकरणे असुन त्यामध्ये पाचवे प्रकरण हे ‘आठवण महानायकांच्या वाणीची’ असे असून सदर प्रकरणांमध्ये महानायक वसंतराव नाईक साहेब यांनी हरितक्रांती करिता जलक्रांती अंतर्गत जलसंवर्धनाची मोठ मोठी धरणे, बंधारे करून कोरडवाहू शेतीला ओलितामध्ये परिवर्तित केले त्याबाबतचे फोटो सहित माहिती दिलेली आहे. लेखक आत्माराम राठोड यांनी हे पुस्तक महानायक वसंतराव नाईक, जलनायक सुधाकरराव नाईक व पाण्यासाठी तडपत वन वन फिरणाऱ्या विविध जिवांना अर्पण केले आहे.

याच अधिवेशनात ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदावर माजी नगर सेवक, बंजारा समाजाचे आर्वीचे कारभारी तथा समाजसेवक दिलीप हंसराज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते गत १५ वर्ष नगर परिषदेचे सदस्य होते. याकाळात नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांचा त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. तर आता त्यांची पत्नी सौ. हेमलता जाधव ह्या नगर सेवीका म्हणुन निवडुण आल्या आहेत.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा नगर परिषद माजी उपाध्यक्ष दशरथ जाधव, नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती संजय राऊत, नगर सेवक प्रशांत ठाकुर, प्रा. शांताराम जाधव, प्रा. प्रकाश पवार, प्रा. नुरसिंग जाधव, सुरेश राठोड, प्रा. यशवंत जाधव. प्रा. दीपक चव्हाण, प्रा. आप्पाराव राठोड, गेमसिंग राठोड, पंतुसींग जाधव, किसना जाधव, माजी मुख्याध्यापक प्रेमसिंग राठोड, महेश देवसोध , अरविंद राठोड, स्वप्निल रणनवरे, डॉ. विनीत राठोड, तेजस जाधव, कीर्तीराज जाधव आदिंनी अभीनंदन करुन सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

