महाराष्ट्रसमारंभ

‍पिंपळखुटा येथे संत सुभाष बाबा यांचा ७१ वा जन्मोत्सव सोहळा, भागवत सप्ताह, खंजीरी भजन स्पर्धा, गित गायन, गोपाल काला व यात्रेचे आयोजन

आर्वी,दि.२४:- जन सामान्याचे दु:ख निवारक म्हणुन गणल्या गेलेले श्री संत सुभाष बाबा यांच्या ७१ व्या जन्मोत्सवा निमीत्त लगतच्या पिंपळखुटा येथे भागवत सप्ताह, खंजीरी भजन स्पर्धा, गोपाल काला, गित गायन व यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रवीवार (ता.२५) पासुन यात्रेला सुरूवात होणार असुन जास्तीत जास्त भावीक भक्तांनी या सोहळ्याला उपस्थीती दर्शवुन भक्तीमय वातावरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.

सोमवार (ता.२६) पासुन तर बुधवार (ता.२८) पर्यंत विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  याचे उद्घाटन खासदार अमर काळे यांच्या हस्ते होणारअसुन संत सयाजी महाराज, गुरूकुंज आश्रमाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, केंद्रीय मध्यवर्ती प्रतिनीधी दामोदर पाटील आदि मान्यवर या कार्यक्रमाचे प्रमुख अतीथी आहेत. तर बुधवारी (ता.२८) होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुमीत वानखेडे हे असुन मंगेश साठे, प्रफुल, कापसे  हे प्रमुख अतीथी आहेत. यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या शिवाय बुधवारी (ता.२८) अमरावती येथील संवीधान मनोरे यांच्या भजन गायानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

पिंपळखुटा येथील श्री गुरूदेव सेवा मंडळ व श्री संत सुभाष बाबा देवस्थान कमिटी आणी पिंपळखुटा येथील समस्त रहिवासी यांच्यावतीने या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या भक्तीमय सोहळ्याचा लाभ परिसरातीलच नव्हे तर, सर्व भावीक भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button