महाराष्ट्रशासकीय उपक्रम

वन विभागाने, वन्यजीव व प्राणी निवारा मदत केंद्र निर्माण करावा, निधी उपलब्ध करुन देणार – आम. सुमीत वानखेडे यांची सुचना, पर्यावरण बचाव समीती व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने, पशुरोग निदान उपचार व रेबीज लसीकरण शिबीराचे आयोजन. यावेळी मार्गदर्शन करतांना दिले आश्वासन. या शिबीरात ६५ श्र्वानांना व १३ मांजरींना रेबीजचे केले लसीकरण

आर्वी,दि.३०:- सारंगपुरी परिसरात वनविभागाकडे मोठी जमीन उपलब्ध असुन त्या ठिकाणी वन्यजिव व प्राण्यांच्या संरक्षणाकरीता वन्य जिव व प्राणी मदत निवारा केंद्र निर्माण करावा. अशी आदेश वजा सुचना आमदार सुमीत वानखेडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देवुन, या करीता लागणारा निधी मी जिल्हा नियोजन समीतीच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देईल असे आश्वासन दिले.

७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचीत्य साधुन पर्यावरण बचाव समिती व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सोमवारी (ता.२६) येथील नगर परिषद प्रशासकीय इमारती समोर पशुरोग निदान उपचार व रेबीज लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबरीचे उदघाटन आमदार वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.

   या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे ह्या होत्या. तर, उपाध्यक्ष गौरव जाजु, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त, डॉ. भारतभुषण अस्वार, ठाणेदार सतिश डेहणकर, वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारले, राऊंड ऑफीसर श्रध्दा मुन, इंग्लीश विषय तज्ञ प्रदिप मोकद्दम हे प्रमुख अतिथी होते.

आमदार वानखेडे यांनी पुढे मार्गदर्शन करतांना, माणुस वेडाच्या भारात मानसाला मारायला लागल्याचे सांगून, शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा हौदोस वाढल्याचा उल्लेख केला. यांचा बंदोबस्त करण्याकरीता नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे व उपाध्यक्ष गौरव जाजु यांना सुचना केल्या तसेच अप्रीय घटना टाळण्यासाठी व समाज हिताकरीता प्राणी प्रेमींनी सुध्दा या उपक्रमात सहभाग घ्यावा अशी अपेक्षा वर्तवीली.

    याशिवाय उपाध्यक्ष गौरव जाजु, सहाय्‌यक आयुक्त डॉ. भारतभुषण अस्वार, ठाणेदार सतीश डेहणकर, वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारले, राऊंड ऑफीसर श्रध्दा मुन, यांनी समयोच्चीत मार्गदर्शन करुन पर्यावरण बचाव समिती व प्राणी मित्रांच्या कार्याची प्रसंशा केली तर, पर्यावरण बचाव समितीच्या शुभम जगताप यांनी समितीच्या वाटचालीची माहिती दिली.

     शहरात श्वानांची संख्या वाढली असुन त्यांना रेबीज रोगाची लागण होवु नये म्हणुन प्रतिबंधक औषधीचे लसीकरण करण्याकरीता या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरामध्ये ६५ श्वानांना व १३ मांजरीना रेबीज लसी लावण्यात आल्या, तसेच  जनवारांवर उपचार करुन, जंत निर्मुलन औषधीचे वाटप सुध्दा करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन भुमीका मोकद्दम यांनी करुन आभार मानले

कार्यक्राच्या यशस्वीत्तेकरीता पर्यावरण बचाव समीतीच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button