महाराष्ट्रशैक्षणीक

*** वर्धा जिल्हा माध्यमीक शाळा शिक्षकेत्तर संघटनेच्या कार्यकारणीची निवड *** जिल्हाध्यक्ष पदी अनील वैध्य तर, चंद्रमणी जवादे उपाध्यक्ष ***

आर्वी,दि.५:- वर्धा जिल्हा माध्यमीक शाळा शिक्षकेत्तर संघटनेच्या, जिल्हा कार्यकारणी निवडकरीता. सेवाग्राम येथील महिलाश्रम अध्यापक विध्यालयात शनिवारी (ता.तिन) आमसभा घेण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष पदाकरीता आष्टी येथील अनिल वैध्य यांची तर उपाध्यक्ष पदाकरीता समुद्रपुर येथील चंद्रमणी जवादे यांची निवड करण्यात आली. याशिवाय इतर पदाधिकाऱ्यांची सुध्दा निवड करण्यात आली आहे.

या सभेचे अध्यक्ष शिक्षकेत्तर महामंडळाच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अनिल माने हे होते तर, पुण्याचे शिवाजी खांडेकर, ठाण्याचे विनोद गोरे, साताऱ्याचे इमरान मुल्ला हे प्रमुख अतिथी होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सतीश बिवाईक (हिंगणघाट) यांनी काम पाहिले तर, राम जोशी (वर्धा) हे सहाय्यक निवडणुक अधिकारी होते.

    निवडणुकीत महिला उपाध्यक्ष पदावर प्रतीबाला दुबे (पुलगाव), कोषाध्यक्ष पदी प्रदिप मिर्झापुरे (देवळी), कार्यवाह पदी विजय शेंडे (वर्धा), सहकार्यवाह पदी दिपक चौधरी (हिंगणघाट), जिल्हा संघटक पदी संदिप हिरुटकर (आष्टी), महिला संघटक पदी मेघना तायडे (वर्धा), प्रसिध्दी प्रमुख म्हणुन संजय पडोळे (आर्वी) यांची तर, दिलीप पवार, नरेश करडे (कारंजा), मानमोडे (समुद्रपुर), प्रदिप गोलाईत (सेलु),गहुकर (समुद्रपुर) यांची कार्यकारणी सदस्य पदावर निवड करण्यात आली आहे.

            या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button