*** वर्धा जिल्ह्यात एकाच दिवशी गावठी दारु भट्टयांवर छापेमारी *** दोन कोटी २९ लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त, *** १३२ आरोपींवर १२६ गुन्हे दाखल *** वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची “सर्जिकल स्ट्राईक योजना” ***
*** अशी राबवीली”सर्जीकल स्ट्राईक योजना” *** भविष्यातील कठोर कारवाईचे हे संकेत *** धडक मोहिमेने झालेली सुरुवात पुढे थंडावणार काय? *** ***
आर्वी,दि. १०:- वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या हातभट्टीची दारु गाळल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी “सर्जीकल स्ट्राईकची योजना” आखली आणी एकाच दिवशी शुक्रवारी (ता. नऊ) ठिकठिकाणी छापेमारी करुन दोन कोटी २९ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन १३२ आरोपींवर १२६ गुन्हे दाखल केले. यामुळे हातभट्टी दारु निर्मीते व साठवणुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारु गाळुन, साठवणुक करुन गावागावात व शहरात पुरवठा केल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना मिळाली. त्यांनी दारु निर्मीतीच्या संपुर्ण साखळीवर आळा घालण्याचा निर्णय घेतला आणी अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने संपुर्ण जिल्ह्यात “वाशआऊट” मोहिम राबवीली. तसेच या मोहिमेत आरोपीं विरुध्द नवीन कायद्यानुसार ई साक्ष ॲप्लिकेश चा वापर करुन तांत्रीक पुरावे गोळा करण्यात आले.

अशी राबवीली”सर्जीकल स्ट्राईक योजना”
वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारु निर्माण करुन त्याची विक्रेत्यांच्या माध्यमातुन विक्री केल्या जाते. या साखळीवर पुर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी “सर्जीकल स्ट्राईक योजना” आखली. गोपणीय माहितीच्या आधारे सलग गत पाच-सहा दिवस अवैध दारुभट्टयांच्या ठिकाणावर विशेषत: शहरा लगतच्या ठिकाणावर लक्ष केंद्रीत करुन गोपणीय माहिती गोळा केली. चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे ३७० पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार केली आणी बेमालुम पणे शुक्रवारी (ता.नऊ) पहाटे चार वाजल्या पासुन एकाच वेळी गावठी दारु भट्टीच्या ठिकाणावार छापेमारी करण्यात आली.

भविष्यातील कठोर कारवाईचे हे संकेत
वर्धा जिल्ह्यात हातभट्टी असो अथवा देशी, विदेशी दारुचा अवैध्य व्यवसाय चालणार नाही. तसेच जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याकरीता कोणताही व्यत्यय येवुन नये याकरीता वेळ पडली तर कठोर कारवाई सुध्दा भविष्यात होवु शकते असे स्पष्ट संकेत या कारवाईच्या माध्यमातुन पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिल्याचे बोलल्या जात आहे.

धडक मोहिमेने झालेली सुरुवात पुढे थंडावणार काय?
वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा असुन संपुर्ण दारुबंदी आहे मात्र या जिल्ह्यात सर्वात जास्त व सर्वात महाग दारु विकल्या जाते हा इतीहास आहे. काही वर्षा अगोदर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणुन के. एल. प्रसाद यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी दारु विक्रेतेच काय तर घरी दारु पीणारे सुध्दा घाबरत होते. एका पत्रकाराला तर आठ दिवस घर सोडून बाहेर रहावे लागले. ऐवढच नाही तर अवैध्य व्यवसायीक सुध्दा थराथरा घाबरत होते ऐवढा त्यांनी दरारा निर्माण केला होता. हिच अपेक्षा या मोहिमेच्या माध्यमातुन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार यांच्याकडून निर्माण झाली असली तरी धडक मोहिमेने झालेली सुरूवात पुढे थंडावणार काय? अशी शंका सुध्दा निर्माण केल्या जात आहे.
