दारु झाली महाग आणी जोडे झाले स्वस्त, २०२६ च्या अर्थ संकल्पात कुठे मिळाली सवलत तर कुठे पडले झटके, माईक्रोवेव, सोलर एनर्जी संबंधीत वस्तु, कँसरच्या औषधी, चामड्याचे जोडे, कापडांची निर्यात आदि स्वस्त झालेत.

आर्वी, दि.१:- केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारमण यांनी रवीवारी (ता.एक) सलग नवव्या वेळी देशाचा २०२६-२७ चा अर्थ संकल्प सादर केला आहे. यात सामान्य मानसा करीता सगळ्यात मोठी आणी सवलतीची बातमी म्हणजे चामड्याचे जोडे आणी कापड निर्यात, माइक्रोवेव, सोलर एनर्जी संबंधीत वस्तु आणी कँसर च्या दवाई स्वस्त झाल्या आहेत. अर्थ संकल्पात एकीकडे एक एप्रील २०२६ पासुन इनकम टैक्स एक्ट लागू करण्यात येणार आहे. तर, त्यातल्या त्यात दारु महाग होत आहे.
अर्थ संकल्पात टैक्स बाबत कुठलीही मोठी घोषणा करण्यात आली नाही. तर सवलत सुध्दा दिल्या गेली नाही, कृषी क्षेत्राला बढावा देण्याकरीता व देशाची सरंक्षण यंत्रणा प्रबळ करण्याकडे या अर्थ संकल्पाच्या माध्यमातुन खास लक्ष केंद्रीय करण्यात आले आहे. आर्थीक वर्ष २०२६-२७ चा हा अर्थ संकल्प “विकसीत भारत २०४७” च्या लक्ष्याकडे नेण्यासाठी मोठी भुमीका बजावणार आहे. एकीकडे देश अमेरिकी टैरिफ चा सामना करत असुन जगात वैश्र्वीक अनिश्र्चितेची परिस्थीती निर्माण झालेली आहे. अशात हा अर्थ संकल्प सादर केल्या जात आहे हे महत्वाचे आहे.
काय झाले महाग आणी काय झाले स्वस्त
२०२६ च्या अर्थ संकल्पात मिनरल्स, स्क्रैप आणी दारु महाग झाली आहे.
तर, चामड्याच्या वस्तु, कापड, सिंथेटीक फुटवीयर, विदेश यात्रा, कँसरच्या १७ औषधी, माइक्रोवेव ओवन, जोडे, एयरक्राफ्ट निर्माण करण्याकरीता लागणाऱ्या वस्तु, ईव्ही बैटरी, शुगरच्या दवाई, चामडे आणी कापडाची निर्यात, बायोगैस मिक्स्ड सीएनजी च्या सर्व वस्तु, सोलर ग्लास, विमानाचे इंधन हे स्वसत झाले आहे.
विकसित भारताकड़े पाऊलल टाकणारा अर्थसंकल्प–
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
केंद्रिय अर्थमंत्री निर्मलाजी सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाला नवी उर्जा देणारा असून आत्मनिर्भर विकसित भारताची वाटचाल करणारा आहे. अर्थमंत्री सितारमण यांनी अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.10 वर्षात 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्याची तरतूद करण्यात आली. अपघात विमा वर आता टॅक्स रद्द करण्यात आला त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. मंदिरांसाठी 5 हजार कोटीची तरतूद, महिलासाठी खास मार्टची उभारणी करण्यात येणार आहे. तथापि, महिलांना सक्षम होण्यास चालना मिळणार आहे. शेतक-यासाठी एआय टूल तयार करण्यात येणार असून पशुपालनसाठी अनुदान,शेतक-यांचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात येणा-यां मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाला बायो हब बनविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
देशाला भांडवलशाही, एकाधिकार शाहीकडे नेणारा वांझोटा अर्थसंकल्प – खासदार अमर काळे

या अर्थ संकल्पात युवकांना रोजगाराच्या कोणत्याही संधी नाही. शेतमालाला भाव नाही. शहराचे विस्तारीकरण करणाऱ्या उपाय योजना नाही. त्याच जुन्या योजनांना नवीन साज चढवुन सादर केलेला हा अर्थ संकल्प आहे. एकीकडे देशातील जनता महागाईने होरपळली जात असतांना कोणताही दिलासा नाही. शेतमालाला दिडपट भाव देण्याचे आश्वासन हवेत विरले. वन्य प्राण्यापासुन पिकांचे नुकसानी बाबत उपाय योजना शुन्य आहे. मध्यम वर्गीय तर कुठेच दिसत नाही. हा अर्थ संकल्प निवडणुका संपल्याने तुमचे काम संपले असे दर्शविणारा अर्थ संकल्प आहे
भारताला समृध्दीच्या शिखरावर नेणारा अर्थ संकल्प
आमदार सुमीत वानखेडे

केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पांना नवी दिशा देणारा आहे. कर्तव्य भवनातून मांडलेला हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक विकासाचा आराखडा नसून सामान्य जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करणारा ‘कर्तव्य दस्तऐवज’ आहे. भारताला जागतिक ‘एक्सपोर्ट हब’ बनवणे, बायो-फार्मासाठी १० हजार कोटींची तरतूद आणि कॅन्सर-मधुमेहाची औषधे स्वस्त करणे यांसारख्या निर्णयांतून सर्वसामान्यांचे आरोग्य आणि आर्थिक उन्नती यांचा विचार करण्यात आला आहे. १५ हजार शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब आणि ‘महात्मा गांधी ग्राम स्वराज’ योजनेच्या माध्यमातून शिक्षण आणि ग्रामीण विकासाचा नवा अध्याय सुरू होईल. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या सूत्राला धरून मांडलेला हा अर्थसंकल्प भारताला समृद्धीच्या शिखरावर नेणारा ठरेल, असा मला ठाम विश्वास आहे.”
देशाला मजबुतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे…
डॉ. रवींद्र सोनटक्के

आजच्या अर्थसंकल्पामध्ये वैयक्तिक नागरिक म्हणून विशेष काही दिसत नसले तरी देशामध्ये पायाभूत सुविधा सेवा क्षेत्र व संरक्षण या मध्ये देश मजबूत होईल. याकडे लक्ष दिल्या जाते. शाळा, महाविद्यालय मध्ये AI शिक्षण दिल्यामुळे नवीन तंत्रज्ञान स्वीकारून नवीन पिढी घडविणे. मुलींच्या शिक्षणावर परत भर देण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृह होणार आहे. आयकर दर व स्लॅब मध्ये काही बदल नाही पण आयकर प्रणालीमुळे काही कलम रद्द झाले आणि आयकर विवरण सुटसुटीत राहणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित फार काही नाही पण कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान यावं AI चा वापर व्हावा तसेच पशुपालक, दुग्ध उत्पादकांना याचा फायदा होणार आहे. सागरी किनारपट्टीच्या शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. कॅन्सर व मधुमेह या आजारावरील औषध स्वस्त होईल, त्याचा मात्र फायदा सर्वसामान्यांना होईल या अर्थसंकल्पामध्ये पर्यटन क्षेत्राच्या विकासावर सुद्धा भर दिला आहे.


