पोलीस प्रशासन विभागाच्या व महावितरणाच्या नवीन इमारतीचे झाले भुमी पुजन चुकीच काम करणाऱ्या समाजातील प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई होणारच – पालक मंत्री पंकज भोयर

आर्वी,दि.५:- राज्याची सुत्रे जेव्हा पासुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली तेव्हा पासुन पोलीस आयुक्त असो, पोलीस अधिक्षक कार्यालय असो अथवा पोलीस स्टेशनच्या ईमारती सुसज्ज करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परिसरातील कायदा व सुव्यवस्था जोपासण्याच काम ज्या इमारती मधुन केल्या जाते, ती इमारत चांगली असावी हा या मागचा उद्देश असुन याच माध्यमातुन येथील पोलीस प्रशासनाच्या इमारतीच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. या ठिकाणावरुन चुकीचे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई होणारच असे पालक मंत्री पंकज भोयर यांनी यावेळी सांगीतले.
येथील पोलीस प्रशासन विभाग व महावितरण कार्यालयाच्या इमारतीचे भुमीपुजन गुरूवारी (ता.पाच) त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते.

या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य दादाराव केचे, आमदार सुमीत वानखेडे, खासदार सुधाकर कोहळे, नगर परिषद अध्यक्षा सौ स्वाती गुल्हाणे, वर्धा जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्या कार्यकारी अधिकारी पराग सुमन, उप वन संरक्षक हरविरसिंग, अप्पर पोलीस अधिक्षक सदाशीव वाघमारे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले, गट शिक्षण अधिकारी पंकज तायडे हे प्रमुख अतीथी होते तर उपविभागीय अधिकार विश्र्वास सिरसाट व तहसीलदार हरिष काळे हे प्रामुख्याने उपस्थीत होते.

पुढे मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगीतले की, वर्धा जिल्हा दारुबंदी जिल्हा आहे. या बाबत अनेक तक्रारी येतात मात्र नमुना तपासणीला नागपुरला पाठवावे लागते परिणामी न्याय मिळायला विलंब होतो यातुन मार्ग काढण्याकरीता वैज्ञानीक प्रयोग शाळा निर्माण करण्याची मागणी केली याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मंजुरी दिली असुन येत्या कॅबिनेट मध्ये त्याला अंतीम मान्यता मिळणार असल्याची माहिती दिली आणी लवकरच जिल्ह्यात न्याय सहाय्यक वैज्ञानीक प्रयोग शाळा हाे्ईल असे सांगीतले. याशिवाय प्रत्येक डि. वाय. एस. पी. कार्यालयाला मोबाईल फॉरेन्सीक व्ह्यान उपलब्ध करुन दिल्याची सांगुन या माध्यमातुन घडलेल्या गुन्ह्याची सत्यता शोधण्याकरीता मदत होईल अशी अपेक्षा वर्तवीली.

आमदार दादाराव केचे यांनी मार्गदर्शन करतांना, पोलीस प्रशासनाच्या गलथन कारभारावर चांगलीच टिका केली, शहरात दारुचा, सट्याचा मुक्त व्यवसाय सुरू असल्याचे सांगीतले. पोलीस स्टेशन मधील फोन सुरू राहत नसल्याचे सांगुन जर फोन सुरू असता तर मागे दोघांचे खुन झाले नसते तर तिन चार लोक जख्मी झाले नसते. पोलीस ठाण्यात तक्रार घेतल्या जात नाही. त्यांचे फोन नेहमी बंद राहतात अशी खंत व्यक्त करुन यात सुधारणा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

आमदार सुमीत वानखेड यांनी मार्गदर्शन करतांना, विधान सभेच्या विकासा करीता इन्फ्रास्ट्रक्चरचे काम हाती घेतल्याची माहिती दिली, प्रत्येक विभागाला स्वतंत्र व सुसज्ज अशी इमारत राहीवी, त्या ठिकाणावरुन चांगल प्रशासन चालाव हि या मागची भुमीका असल्याचे सांगीतले. मागील काळात नगर परिषद, प्रशासकीय इमारत, न्यायालयाच्या ईमारतीचे बांधकाम केले असल्याची माहिती देवुन आता पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारत व महावितरण विभागाच्या इमारतीचे भुमीपुजन करण्यात आले आहे. याशिवाय सिसिटीव्ही प्राजेक्ट सुध्दा मंजुर करण्यात आला असुन या मध्यमातुन नागरीकांची सुरक्षा करण्याकरीता मदतीचा हात मिळणार आहे अशी माहिती दिली. पुढे कृषी विभागाची स्वतंत्र इमारत निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगीतले. प्रशासनाने काम करतांना कुठल्याही लोक प्रतीनीधीला कार्यालयात येण्याची गरज पडु देवु नये सामान्य मानसाला जिथल्या तिथेच न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा वर्तवीली.
कार्यक्रमाची प्रस्तावना वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी मांडली. आभार उपविभागीय पोलीस अधिक्षक चंद्रकांत ढोले यांनी मानले तर, संचालन अम्मलदार स्मीता महाजन यांनी केले
या कार्यक्रमाच्या यशस्वीत्ते करीता ठाणेदार सतीश डेहणकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांच्यासह संपुर्ण पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

