महाराष्ट्र

यावेळी शाळेतील शिक्षक श्री अनिल माहूरे, अर्चना पोटदुखे, सागर टिप्रमवार , प्रवीण संभे, श्रीकांत बोबडे, अतुल साळवे, संजय कुंभारे,मंजिरी धांदे, प्रदीप रावेकर ,मोना केने, अश्विनी गायकवाड, पल्लवी हरडे, आशिष उभाड व हरीश बहिरम उपस्थित होते..

आर्वी,दि.९:- पुलगाव-देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाणे यांचा वाढदिवस, पुलगावच्या ज्ञानभारती विध्यालयात साजरा करण्यात आला यावेळी होतकरु विघ्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

          वाढदिवस म्हटल की त्याला परदेशी संस्कृतीची झ्यालर चढवल्या जाते. सार्वजनीक ठिकाणी केक कापुन व हुडदंग करुन वाढदिवस साजरा केल्या जातो. मात्र भारतीय संस्कृती मध्ये गरजवंताना मदतीचा हात देण्याला जास्त महत्व दिल्या जाते. याच संस्कृतीचे पालन ज्ञानभारती विध्यालयाच्या माध्यमातुन करण्यात आले आहे. होतकरु विध्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवीण्याच्या दृष्टिने आमदार राजेश बकाणे यांच्या वाढदिवशी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यात तिन नोटबुक, पेन्सिल, खोड रबर, आणी शार्पनरचा समावेश होता. यामुळे विध्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तर तयार झालेच,शिवाय भारतीय संस्कृतीची जपवणुक सुध्दा करण्यात आली.

जेष्ठ शिक्षक देवेंद्र गडेकर व सागर टिप्रमवार यांनी केलेल्या अर्थसहाय्याने साकार झालेल्या या कार्यक्रमाचे, प्राचार्या सौ. सुनीता भुरूकुंडे, नगर सेवक दुर्गेश यादव, संस्थेचे सचिव ॲड. नितीन रावेकर, उपाध्यक्षा ॲड. सौ. नेहाताई रावेकर हे प्रमुख अतिथी होते.

यावेळी शाळेतील शिक्षक अनिल माहूरे, अर्चना पोटदुखे,  प्रवीण संभे, श्रीकांत बोबडे, अतुल साळवे, संजय कुंभारे, मंजिरी धांदे, प्रदीप रावेकर, मोना केने, अश्विनी गायकवाड, पल्लवी हरडे, आशिष उभाड,  हरीश बहिरम  आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अक्षय बाळापुरे यांनी करुन आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button