निकृष्ठ बांधकाम

कंत्राटदाराची दिरंगाई आणी शेतकरी व दुग्ध उत्पादत आले अडचणीत, मुसळधार पावसात कारंजा- सावरडोह मार्गावरील वळण रस्ता गेला वाहुन, सुमारे १२ गावाचा सरळ संपर्क तुटला. परिणामी शेतकरी व दुग्ध उत्पादत आले अडचणीत

कारंजा (घा.):- बुधवारी (ता.२४) झालेल्या मुसळधार पावसात कारंजा (घा) ते सावरडोह मार्गावरील पर्यायी वाहतुकीकरीता बनवीलेला वळन रस्ता वाहुन गेल्याने सुमारे दहा ते बारा गावातील लोकांना फटका बसला असुन त्यांचा थेट वाहतुक संपर्क तुटला आहे. तर, परिसरातील शेतकरी व दुग्ध उत्पादक अडचणीत आले असुन त्यांना ३० किलो मिटर फेरा घेवुन प्रवास करावा लागत आहे.

कारंजा- सावरडोह मार्गावरील पुलाचे बांधकाम गत अनेक महिण्यापासुन संथ गतीने सुरू आहे. प्रवाशी व वाहतुकदारांच्या सोयी करीता कंत्राटदाराने थातुरमातूर पध्दतीने वळन रस्ता निर्माण केला होता. मात्र बुधवारी (ता.२४) झालेल्या मुसळधर पावसात हा वळण रस्ता वाहुन गेला. परिणामी सुमारे दहा ते बारा गावातील नागरिकांचा कारंजा (घा) सोबतचा थेट वाहतुक संपर्क तुटला.

सावरडोह परिसरातील शेतकरी, दुग्ध उत्पादक व नागरीक यांचे सर्व व्यवहार कारंजा (घा.) या तालुक्याच्या ठिकाणासोबत निगडीत आहे. शिवाय पाऊस आल्यामुळे शेत पेरणीची लगबग सुध्दा सुरू झालेली आहे. बि- बियाणे व खेत  खरेदी सुरू झाली असुन याच्या वाहतुकी करीता तिस किलोमिटरचा फेरा खावा लागत आहे. तर, दुसरीकडे या परिसरात दुग्ध व्यवसाय जोरात असुन त्यांची सुध्दा मोठी अडचण झालेली आहे. तिस किलोमिटरचा लांब पल्ला व उष्णवातारण यामुळे दुध खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकंदरीत पाहता शेतकरी व दुग्ध व्यवसायीकांवर यामुळे आर्थीक बोझा तर वाढलाच आहे. शिवाय मौल्यवान वेळ सुध्दा  द्यावा लागत आहे.

बांधकाम विभागाने तातडीने वाहतुकीकरीता पर्यायी मजबुत मार्ग तयार करुन द्यावा. पुलाचे बांधकाम जलदगती करण्याचे आदेश कंत्राटादारला द्यावे. निकृष्ट दर्जाचा वळण रस्ता बनवील्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button