महाराणा प्रताप सिंह हे केवळ राजपुत समाजाचे नव्हे तर हिंदु धर्मीयांच्या आदरस्थानी होते – नंदकिशोर दिक्षीत
विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्सात साजरी.

आर्वी,दि. १८:- मातृभूमीच्या स्वाधीनतेसाठी आपले संपुर्ण जीवन अर्पण करणारे विर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह हे एक अलौकीक योध्दा तर होतेच, शिवाय त्यांचे साहस आणी त्यांनी केलेले बलीदान कोणीच विसरु शकत नाही. ते केवळ राजपुत समाजाचेच नव्हे तर हिंदु धर्मीयांच्या आदरस्थानी होते असे प्रतीपादन नंदकिशोर दिक्षीत यांनी येथे केले.
येथील सकल राजपूत क्षत्रीय समाजाच्यावतीने बुधवारी (ता.१७) येथील विश्रामगृहात मोठ्या उत्सात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. या निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर सिह दिक्षीत हे होते. तर, लखनसिंह गौर ठाकुर, राजेंद्रसिंह दिक्षीत, नगरसेवक प्रशांत ठाकुर, नरेंद्रसिंह चौहान, दिनेश सिंह सोलंकी हे प्रमुख अतिथी होते.
कार्यक्रमाची सुरूवात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिषेकाने झाली. यावेळी मान्यवरानी मार्गदर्शन करतांना महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणी त्यागमय जीवन कार्याला उजाळा देवुन त्यांच्या आदर्शाचा अंगीकार समाजहितासाठी करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले.
प्रस्तावना सुशील सिंह ठाकुर यांनी मांडली, संचालन प्रा. राजेश सोळंकी यांनी केले. तर, आभार कपिलसिंह ठाकुर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता पवनसिंह ठाकुर, प्रेम कछवा, संजय ठाकूर, मंगलसिंग बैस, शैलेश सिंग चव्हाण, भरतसिंह शेंगर, बबन सिंह चंदेल, दीपकसिंह मोरे तथा राजपुत समाज व नगरवासीयांनी सहकार्य केले.



