Uncategorized

शेतकऱ्यांने खोदुन घेतली विहीर, शासकीय अनुदानाची उचल सुध्दा केली. कंत्राटदाराकडुन काम करुन घेतलं. मात्र कामाचे पैसे न देता दाखवीला अंगठा.

आर्वी,दि.११:- बिरसा मुंडा योजने अंतर्गत नवीन विहीर बांधकामा साठी शेतकऱ्याला मंजुरी मिळाली. त्याने पैसे नसल्यामुळे कंत्राटदारासोबत करार केला. कंत्राटदाराकडून बांधकाम करुन घेतले. आलेल्या शासकीय अनुदानाची उचल सुध्दा केली. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील बांधकाचे पैसे न देता अंगठा दाखवील्याची घटना घडली असुन या प्रकरणी कंत्राटदाराने पोलीसात तक्रार सुध्दा केली आहे.

बोरगाव हातला येथील किशोर राऊत यांना मौजा मिर्झापुर (नांदोरा) शिवाराच्या शेतात बिरसा मुंडा योजने अंतर्गत नवीन विहीर बांधण्याकरीता मंजुरी मिळाली. याकरीता चार लाख रुपयाचे अनुदान मंजुर झाले. योजनेच्या नियमानुसार आधी बांधकाम करा नंतर अनुदानाची रक्कम आवंटीत करण्याची अट आहे. किशोर राऊत या शेतकऱ्याकडे पैसे नसल्यामुळे त्याने याचा कंत्राट प्रवीण दिगंबर मनवर याला दिला. बांधकामाचा पहिला टप्पा आला मात्र पहिल्या टप्याचे पैसे देण्यास अनाकानी केली. धनादेश दिला मात्र त्यावर सही खोटी केली शेवटी बॅक व्यवस्थापकाने किशोर राऊत यांना बँकेत बोलावुन प्रत्यक्षात सही घेतली. दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरूवात झाली या दरम्यान पाणी लागले हे पाणी तोडण्याचे काम शेतकऱ्याकडे मात्र त्यांनी पाणी तोडले नाही. काम करण्याकरीता येत असलेले मजुर परत जावु लागले. पाण्याचा उपसा न झाल्यामुळे पातळी वाढली आणी विहीर खचली. यानंतर शेतकऱ्याचे नुकसान होवू नये म्हणुन त्याच विहीरी लगत २२ फुटा पर्यंत दुसरी नवीन विहीरीचे खोदकाम केले. याचे मोजमाप, मॅप टॅपींग सुध्दा झाले आणी दुसऱ्या टप्प्याचे एक लाख ७० हजार रुपयाच्या अनुदानाचे धनादेश शेतकरी किशोर राऊत याला मिळाले. मात्र त्याने बांधकाम करणारा कंत्राटदार प्रवीण मनवर याला त्याच्या कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. या प्रकरणी त्यांनी येथील पोलीस स्टेशन मध्ये तक्रार सुध्दा दिली असल्याची माहिती कंत्राटदार प्रवीण मनवर यांनी दिली.

कंत्राटदार हा सुशिक्षीत बेकार असुन नौकरी नसल्यामुळे छोटे, छोटे काम मिळवुन व परिश्रम करुन यातुन मिळणाऱ्या लाभावर आपला उदरनिर्वाह चालवीतो. शेतकऱ्याने बांधकामाचे पैसे न दिल्यामुळे तो आर्थीक अडचणीत आला असुन पोलीस प्रशासनाने केलेल्या कामाचे पैसे मिळवुन द्यावे अशी त्याची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button