आंदोलन

बाळ जगताप यांच्या नेतृत्वात ॲटो चालक मालक संघटनेचा मोर्चा, आहे त्याच जागेवर ॲटो स्टँड ठेवण्याची केली मागणी, पालक मंत्री पंकज भोयर यांच्या सोबत केली चर्चा

आर्वी,दि.९:- बस स्थानका समोरील ॲटो स्टँड दुसरीकडे हलवु नका. आहे त्याच जागेवर कायम राहु द्या. या मागणीकरीता प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते बाळ जगताप यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.९) भव्य मोर्चा काढण्यात आला या प्रकरणी पालक मंत्री पंकज भोयर यांच्यासोबत सुध्दा चर्चा झाली असुन लवकरच तोडगा निधण्याची शक्यता आहे.

शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाश्यांच्या सोयीकरीता गत अनेक वर्षा पासुन रिक्षा स्टँड आहे. आधी या जागेवर सायकल रिक्षा उभ्या राहत होत्या मात्र कालाओघाने यात बदल होवुन ई-ॲटो व पेट्रोल ॲटो आले. नेमक बस स्थानका पुढेच हे ॲटो स्टँड असल्यामुळे प्रवासात दमुन आलेल्या प्रवाशांकरीता सोयीचे पडते. तर, दुसरीकडे बेरोजगार युवकांना रोजगार मिळत आहे. मात्र हा ॲटो स्टँड दोनशे मिटरवर हटविण्याचा घाट शासनाने घातला आहे. परंतु याकरीता ॲटो स्टँडची जागा तर आखुन दिलीच नाही. शिवाय प्रवाशांच्या दृष्टिने सुध्दा ते सोयीस्कर नाही. बस स्थानक निर्मीती पासुन असलेल्या पुर्वीच्या रिक्षा आणी आताच्या ॲटो स्टँडच्या जागेवरच ॲटो उभे ठेवण्यास बंदी घालु नये अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली असुन अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदन देणाऱ्यांमध्ये ई रिक्शा चालक मालक संगठन अध्यक्ष समीर दिलकश, उपाध्यक्ष किशोर गुलहाने, कुणाल तालेकर, प्रशांत सोनटके, शेख रफीक भाई, रहमान भाई, बंडू माहुरे, विक्की,अबरार खान, शेख अशफाक, राम भैया, अभी, राणा, शहजाद शेख, सोनू कुरैशी, अहेफाज कुरैशी, जाकिर जग्गू , राहुल कुरील, इरशाद शेख, राजू पठान, दानिश शेख, अवधूत भील, साबिर शेख तथा समस्त रिक्षा चालक.

पालक मंत्री पंकज भोयर यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरुन संपर्क

          या प्रकरणी बाळ जगताप यांनी वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री तथा गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधुन त्यांना प्रवाशांची होणारी अडचण, बेरोजगारीवर मात करण्याकरीता ॲटोचा व्यवसाय स्वीकारणाऱ्या युवकांच्या व्यवसायावर होणारा परिणाम. ॲटो स्टँड करीता जागेचे न केलेले नियोजन याची संपुर्ण माहिती दिली. परिणामी त्यांनी स्थानीक पोलीसांना सध्यातरी सुचना दिल्या असुन या बाबत लवकरच बैठक लावुन प्रश्न निकाली काढु असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button