बेढोण्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाख. घरावरचे उडाले छप्पर, जिवनावश्यक वस्तुंची झाली नासाडी. केली शासकीय मदतीची मागणी.

आर्वी,दि.२२:- अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने घरावरील छप्परे तर उडवुन नेलीच शिवाय घरात पावसाचा शिरकाव झाल्याने घरातील जिवनावश्यक वस्तुची नासाडी झाली असुन परिवार रस्त्यावर आले आहे. लगतच्या बेढोणा येथे सोमवारी (ता.२२) सायंकाळच्या सुमारास हि घटना घडली असुन शासनाने त्वरीत मदतीचा हात द्यावा अशी मागणी आहे.

सोमवारी (ता.२२) दुपार पर्यंत उन्हाचा तडाखा सुरूच होता. मात्र सायंकाळी पाच सहा वाजताचे सुमारास अचानक ढग भरुन आले आणी गडगडाट व वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळु लागल्या. अशात काही कळण्याच्या आत वादळाने कल्पना प्रकाश आसोले व राजेश्र्वर विश्र्वनाथ आसोले यांच्या घरावचे छप्पर उडवुन नेले. परिणामी घरात पाण्याचा शिरकाव झाला. यात साठवुन ठेवलेले धान्य, घरातील मौल्यवान वस्तु, हांतरुन पांघरुन कपडे. टि.व्ही आदिंची नासडी होवुन लाखो रुपयाचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच गावकरी व सरपंचांने घटनास्थळाकडे धाव घेतली आणी मदत कार्य सुरू केले.
या अचानक आलेल्या नैसर्गीक आपत्तीमुळे दोन्ही आसोले परिवार रस्त्यावर आले असुन त्यांच्या पुढे निवाऱ्याचा प्रश्न तर निर्माण झालाच. शिवाय उपासमारीची सुध्दा पाळी आली आहे.

शासनाने तातडीने दखल घेवुन मदत करावी
अचानक कोसळलेल्या नैसर्गीक आपत्तीमुळे रस्त्यावर आलेल्या दोन्ही परिवाराला शासनाने तातडीने आर्थीक मदत करावी तसेच घरकुल योजनेच्या माध्यमातुन तात्काळ मदत देवुन निवाऱ्याची सोय करुन द्यावी अशी मागणी आहे.



