आर्वीच्या पारसे भवनात तर, आष्टीत पतंजली योग समिती व तालुका क्रिडा संकुलनच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

आर्वीच्या पारसे भवनात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

आर्वी, दि.२१:- येथील पारसे भवनात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योगाभ्यासाचे धडे देवुन जन जागृती करण्यात आली. यात शहरातील योगप्रेमी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीला.
योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. अर्चना शिरभाते व सौ छाया राजुरकर यांचा या शिबीरात शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. तर, दामले यांनी ‘योगाभ्यासाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना नियमीत योगाभ्यासाचे फायदे, निरोगी जिवन शैली व आरोग्यदायी जिवनाचे महत्व महत्व समाजावुन सांगीतले.
या शिबीरात योगसाधक महिला, पुरुष व बालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीला.
आष्टीत पतंजली योग समिती व तालुका क्रिडा संकुलनच्यावतीने योग दिन संपन्न
आष्टी,दि.२१:- आंतरराष्ट्रीय योग दिना निमीत्ताने रवीवारी (ता.२१) येथील क्रिडा संकुलाच्या भव्य प्रांगणावर पतंजली योग समिती व तालुका क्रिडा संकुलनाच्या संयुक्त विध्यमाने योगाभ्यास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे हे होते. तर, तालुका क्रीडा अधिकारी संदिपजी खोब्रागडे, भागवतराव वसुले, कृष्णराव गेडाम, विशाल निंबेकर, भनेरकर हे प्रमुख अतीथी होते.
या शिबीरात योगगुरु केशवराव चौरेवार व साहेबराव खिरळकर यांनी योगाभ्यासाचे धडे दिले. तर, आरोग्य व मन प्रसंन्न व शरीर सुदृढ ठेवण्याकरीता योगा अभ्यास किती महत्वाचा आहे हे समाजावुन सांगीतले.
या शिबीरात महिला, पुरूष व योगभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐवढेच नाही तर, वायबीआर अकॅड्यामीचे रवी साखरकर यांनी सुध्दा विध्यार्थ्यांसह यात सहभाग नोंदवीला. याशिवाय सौ. मंजुषा गेडाम, सौ. मानकर, सौ. ढोले यांची सुध्दा उपस्थीती होते.
कार्यक्रमाचे संचालन योगगुरू शशिभुषण भुस्कडे यांनी केले. तर यशस्वीत्तेकरीता क्रिडा संचालक अमीत इंगळे, अनिल मोकद्दम यांनी परिश्रम घेतले.


