हृदय हेलावून टाकणारी घटना, खेळता खेळता खड्यात पडले बिबटाचे दोन बछडे, आईने जिवाची पर्वा न करता उडी घेवुन काढले बाहेर, वनविभागाने सिसिटीव्ही मध्ये कैद केली घटना

आष्टी,दि.०२:- शिकारीकरीता जाण्या अगोदर सुरक्षीत ठिकाणी ठेवलेले बिबटाचे दोन बछडे लगतच्या खोल खड्यात पडले होते. मात्र यामुळे विचलीत न होता मादि बीबटाने धैर्याने आपल्या जिवाची पर्वा न करता खड्यात उडी घेतली आणी दोघांनाही सुरक्षीत खड्या बाहेर काढल्याची हृदय हेलावुन टाकणारी घटना सुसूंद्रा परिसरात सोमवारी (ता.एक) घडली असुन वन्य प्राण्यांमधील मातृत्वाची खरी झलक परिसरातील नागकरीकांना अनुभवता आली

आष्टी तालुक्यातील तळेगाव (शा.प.) वन परिक्षेतात येत असलेल्या कारंजा (घा.) साहुर मार्गावरील सुसूंद्रा परिसरातील हि घटना. सोमवारी (ता.एक) दुपारी दिड वाजताचे सुमारास शेतामध्ये काम करीत असलेल्या शेतकऱ्यांना लगतच्या खड्याकडून जोरजोरात ओरडण्याचे आवाज येत होते. त्यांनी जावुन पाहिले तर खड्यात बिबटाचे दोन बछडे पडलेले होते व ते बाहेर निघण्याकरीता धडपड करत होते. याची माहिती त्यांनी पोलीस पाटील व वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. कोणत्याही क्षणी मादी बिबट येण्याची शक्यता असल्याने सर्व परिसर मानवी हालचाली पासुन शांत केले आणी, ठिकठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसवीले. उशीरा रात्री मादी बिबट पिलांचा शोध घेत तेथे पोहचली. खड्यामधुन येणारा आवाज तिच्या कानावर पडला. खड्यात पडलेले बछडे तिला दिसले. त्यांचा केवीलवाना आज तिच्या हृदया पर्यंत पोहचत होता. मात्र यामुळे विचलीत न होता, तिने धैर्य सोडले नाही. खड्याचा अंदाज घेतला आणी आपल्या जिवाची पर्वा न करता उडी घेतली. एक एक करत दोन्ही पिलांना तोडांत धरुन सुखरुप बाहेर काढले आणी बछड्यांसह जंगलाच्या दिशेने निघुन गेली.
हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला असून वनविभागाच्या संयमित व नियोजनबद्ध भूमिकेमुळे जीवितहानी तर टळलीची शिवाय बिबटाच्या बछड्यांना त्यांच्या मातेची साथ सुध्दा मिळाली. मात्र गावकऱ्यांमध्ये या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे.

बिबट मादीने कारंजा (घा) ते साहुर मार्गावरील सुसूंद्रा शेत शिवारा जवळली एका पाईपामध्ये सुरक्षेचा अंदाज घेवुन आपल्या दोन्ही बछड्यांना ठेवले आणी त्यानंतर शिकारीच्या शोधात निघुन गेली. या दरम्यान खेळता खेळता हे दोन्ही बछडे लगतच्या खड्यात पडलले असावे असा प्राथमीक अंदाज वर्तविल्या जात आहे.
तळेगाव वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांने घटनेची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांचे व परिसरातील नागरिकांचे आभार मानले असुन परिसरात वन्य प्राण्यांच्या हालचाली दिसुन आल्यास घाबरुन न जाता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

