अधिवेशनात आमदार सुमीत वानखेडे यांची आक्रमक मांडणी. शेतकरी हिताच्या रखडलेल्या विविध योजनांवर उपस्थीत केले विविध प्रश्न, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी. मंत्री भरत गोगावले यांनी दिले सकारात्मक उत्तर, निधी देण्याचे दिले आश्वासन पावसाळी.

आर्वी,दि.३०:- आमदार सुमीत वानखेडे यांनी सुरवाती पासुनच पावसाळी अधिवेशन दणाणुन सोडले आहे. सन २०२३ पासुन अडकेलेला मनरेगाचा निधी, वैय्यक्तीक लाभाच्या योजना सर्वांकरीता खुला करणे, मातोश्री पाणंद रस्ता योजनेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई आदि मागण्या मंगळवारी (ता.३०) आक्रमक पणे सभागृहात मांडून त्यांनी मंत्री भारत गोगावले यांचे लक्ष वेधुन घेतले. यावर त्यांनी सकारात्मक उत्तर देवुन अवध्या दहा दिवसात निधी देण्याचे आश्वासन दिले.
आमदार सुमीत वानखेडे यांनी अधिवेशनाच्या सुरवाती पासुनच शेतकऱ्यांचे प्रश्न असो, पाणी टंचाई असो, कंत्राटदारांचा प्रश्न असो आदिंची प्रभावी पणे मांडणी केल्यामुळे विधानसभाच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांना सुध्दा दिलासा मिळाला आहे.
सन २०२३ पासुन प्रलंबीत असलेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरी व फळबागांच्या अकुशल कामांसाठी मिळणारा निधी नेमका कधी मिळणार असा थेट प्रश्न उपस्थीत केला. तर, दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या दिरंगाई मुळे व शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे पाणंद रस्त्यांच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचा घणाघाती आरोप सभागृहात करुन कामांचा सवीस्तर अहवाल मागविण्याची मागणी केली. तसेच दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चीत करुन कठोर कारवाई करण्याची सुध्दा मागणी केली. याशिवाय नव्याने सुरू झालेल्या ‘विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ (VB-G RAM G) अंतर्गत फळबाग लागवड व विहीर यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी खुला करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करून त्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली.
आमदार सुमीत वानखेडे यांच्या आक्रमक भुमीकेमुळे फलोत्पादन, रोजगार हमी आणी खार जमीन विकास विभागाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांचे लक्ष वेधल्या गेले. त्यांनी सकारात्मक उत्तर देतांना, त्यांनी ग्रामसभेने ठरवलेली वैयक्तिक लाभाची कामे पूर्वीप्रमाणेच सुरू असून ती कोणत्याही परिस्थितीत वगळण्यात येणार नाहीत अशी ग्वाही दिली. तसेच, अकुशल कामांची जी रक्कम देणे बाकी आहे, ती येत्या ८ ते १० दिवसांत वितरित करण्यात येईल असे मोठे आश्वासन दिले. याशिवाय आमदार वानखेडे यांच्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे सुध्दा आश्वासन सभागृहात दिले.
आमदार सुमीत वानखेडे हे पहिल्यांदाच निवडुन आले असले तरी त्यांना विधानसभेतील कामकाजाचा चांगलाच अनुभव आहे. याचा लाभ उचलत त्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरवाती पासुनच शेतकरी हितांच्या प्रश्नांनचा भडीमार करुन सभागृह गाजवुन सोडले आहे.


