शैक्षणीक
हैबतपुर येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेशोत्सव साजरा. सहाय्यक आयुक्त अंकेश केदार यांनी विध्यार्थ्यांचे केले पुष्पगुच्छ देवुन स्वागत. शालेय साहित्याचे केले वाटप.

आर्वी,दि.३:- लगतच्या हैबतपुर येथील अनुसूचीत जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मंगळवारी (ता.एक) शैक्षणीक नव सत्राच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी समाज कल्याण विभाग वर्धाचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार यांनी पुष्पगुच्छ देवुन विध्यार्थ्यांचे स्वागत केले तर, शैक्षणीक साहित्याचे वितरण सुध्दा केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी दांडेकर ह्या होत्या.
या प्रसंगी सहाय्यक आयुक्त केदार यांनी मार्गदर्शन करतांना, विध्यार्थ्यांच्या प्रगती करीता घ्यावे लागणारे परिश्रम आदिंची माहिती दिली. तर, स्टेशनरी, बुक, पुस्तके, बुट, शालेय ड्रेस आदि शैक्षणीक साहित्याचे वितरण केले.
या वेळी शाळेतील शिक्षक निशांत नडे, ममता देशमुख, महाजन, कर्मचारी तथा पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


