शैक्षणीक

कृषक इंग्लिश विध्यालय व कृषक इंग्लिश (मिडी) प्रायमरीच्या विध्यार्थ्यांनी, शिष्यवृत्ती परिक्षेत मारली बाजी. विध्यालयाचा यश लोणकर तालुक्यातुन प्रथम तर, प्रायमरीची ओमीका कोंडकर तालुक्यातुन दुसरी

आर्वी,दि.५:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्यावतीने २०२६ ला घेण्यात आलेल्या पुर्व माध्यमिक व पुर्व उच्च प्राथमीक शिष्यवृत्ती परिक्षेत येथील कृषक शिक्षण संस्थेव्दार संचालीत कृषक इंग्लिश विध्यालय व कृषक इंग्लिश (मिडी) प्रायमरीच्या विध्यार्थ्यांनी बाजी मारली असुन विध्यालयाचा यश लोणकर हा तालुक्यातुन प्रथम आला आहे तर, प्रायमरीची ओमीका कोंडकर हि तालुक्यातून दुसरी आहे. याशिवाय आठ विध्यार्थी शिष्यवृत्तीकरीता पात्र ठरले आहे. त्यांचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.

शिक्षणात विध्यार्थ्यांची रुची वाढावी, अभ्यासाची ओढ लागावी या हेतुने राज्य सरकारच्यावतीने शिष्यवृत्ती परिक्षा सुरू करण्यात आली आहे. शहरी आणी ग्रामीण अशी विभागणी करुन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व्दारे सन २०२६ मध्ये हि परिक्षा घेण्यात आली होती.

या परिक्षेत कृषक शिक्षण संस्थेव्दारा संचालीत कृषक इंग्लिश विध्यालय व कृषक इंग्लीश (मिडी) प्रायमरी स्कुलच्या विध्यार्थ्यांनी शहरी भागात सहभाग घेतला होता. यातील कृषक इंग्लिश विध्यालयाचा आठव्या वर्गाचा विध्यार्थ्यी यश राजेश लोणकर हा तालुक्यातून प्रथम आला आहे. तर, यश अनिल कोंडेकार तालुक्यातुन तिसरा, कु. सुहानी अमीत बोके तालुक्यातून सातवी आणी कु.  चैताली प्रदिप दरोई हिने तालुक्यातून आठव्या क्रमांक पटकावीला आहे.

   दुसरीकडे, कृषक इंग्लिश (मिडी) प्रायमरी स्कुलची पाचव्या वर्गाची विध्यार्थींनी ओमीका अनिल कोंडेकर हिने गुणानुक्रमे तालुक्यातुन दुसरेस्थान पटकावीले आहे. याशिवाय तनिष्का पंकज वानखेडे, देवेन धिरज दहापुते, अनीमेष ओमप्रकाश डोंगरे, वंश विजय संभे, कु. ज्ञानदा मंगेश निमजे आणी अमोल मेंद्रे हे विध्यार्थी शिष्यवृत्ती करीता पात्र ठरले आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय पालक व शाळेच्या शिक्षकवृंदांना दिले आहे.

कृषक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शोभाताई काळे, कोषाध्यक्ष संदिप काळे, कृषक इंग्लिश (मिडी) प्रायमरी स्कुल शाळेचे मुख्याध्यापक विजय डोळस, कृषक इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रणिता हिवसे तथा शाळेचे संपुर्ण कर्मचारी आदिंनी विध्यार्थ्यांचे कौतुक करुन भावी शैक्षणीक आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button