सामाजीक

“ हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र”अभियान *** आर्वीच्या गृहरक्षक दल पथकाने केले वृक्षारोपण ***

तालुका समादेशक अधिकारी सागरकुमार थेर यांच्या मार्गदर्शनात झाले वृक्षारोपण

आर्वी,दि.४:-  शासनाकडुन राबवील्या जात असलेल्या “ हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र” अभियाना अंतर्गत येथील गृहरक्षक दल पथकाने साप्ताहिक कवायत दिनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन निसर्ग सेवा करण्याचा निर्धार केला.

गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार तालुका समादेशक अधिकारी सागरकुमार थेर यांच्या मार्गदर्शनात येथील पोलीस स्टेशन परिसर, मॉडेल कनिष्ठ महाविध्यालयाचे  मैदान, जाजूवाडी व गजानन महाराज मंदिर परिसर, साईनगर परिसरात वट वृक्षासह विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यात वरिष्ठ प. नायक राजेंद्र  ढबाले, पलटण नायक दिवाकर नाखले, विलास थोरात, सतीश गोमाशे, विजय खांडेकर, मुकेश रेवतकर, महिला प.नायक संध्या थेरे, अनायुक्त अधिकारी सिद्धार्थ भगत, सिद्धार्थ चहांदे, श्रीधर कांबळे, रवींद्र मसराम, प्रमोद फाले, पंजाब कुकडे, अनुसया डेहनकर, रुबीना हुसेन, रेखा डोरले आदिंच्या सह ७० महिला पुरूष होमगार्ड सैनिक सहभागी झाले होते. यावेळी जन सेवे सोबतच निसर्ग सेवा करण्याचा निर्धार सुध्दा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button