*** “मैथीली पालीवाल” या फेक नावाने तयार केला होता फेसबुक खाते **** फेसबुकवर वादातीत पोष्ट टाकणाऱ्या रोहण हिवळेला दोन दिवसाची पोलीस कोठडी ***
***तपासा दरम्यान पोलीस घेणार शोध *** आणी संशय बळावला ***
आर्वी,दि.४- “ मैथीली पालीवाल” या फेक नावाने फेसबुक खाते काढून समाज माध्यमावर धार्मीक, राजकीय, सामाजीक, श्रध्दा, अंधश्रध्दा, वैय्यक्तीक, एैतीहासीक आदी विषयांवर टिका करणे रोहण हिवाळे याला चांगलेच भोवले असून त्याला दोन दिवस न्यायालयीन कोठडीत तर काढावेच लागले शिवाय सोमवार (ता. सहा) पर्यंत पोलीस कोठडीत सुध्दा राहावे लागणार आहे.
संभाजी ब्रीग्रेड मध्ये पदाधिकारी असलेल्या रोहण हिवाळे यांने बेमालुम पणे जिओच्या मोबाईल वरुन “मैथीली पालीवाल” या नावाने फेसबुक खाते काढले आणी विविध विषयावर जळळीत जिव्हारी लागणाऱ्या टिका करणे सुरू केले. दररोज कुठल्यान कुठल्यातरी विषयावर टिकात्मक पोष्ट टाकायचा आणी यावर जोरदार चर्चा व्हायची परिणामी अवघ्या काही दिवसातच मोठ्या प्रमाणात या फेसबुक खात्याचे फालोअर झाले. यात अनेकांच्या भावना सुध्दा दुखावल्या गेल्या तर काहींच्या ते जिव्हारी लागले. हे फेसबुक खाते कोण चालवत याचा शोध घेण्याकरीता अनेक लोक कामी लागले मात्र काही केल्या शोध लागत नव्हता. याच दरम्यान फरवरी महिण्याच्या २१ तारखेला पोलीसात तक्रार दाखल झाली पोलीस यंत्रणा सुध्दा कामी लागली. वर्धा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सतीश डेहणकर यांनी वर्धा सायबर क्राईम कडे प्रकरण सोपवीले त्यांनी मुंबई सायबर क्राईमची सुध्दा मदत घेतली शेवटी रोहण हिवाळे याचे नाव निश्पन्न झाले आणी पोलीसांनी त्याला शुक्रवारी (ता.३१) अटक करुन शनिवारी (ता.एक) येथील फौजदारी व दिवानी न्यायालयात हजर केले. पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र यावेळी रोहण हिवाळे याने पोलीसांनी मारहान केल्याची तक्रार केल्यामुळे त्याची तपासणी करुन न्यायालयीन कोठडीत पाठवीले.
सोमवारी (ता.तिन) रोहण हिवाळे यांचे वकील ॲड. ठाकरे यांनी जामीनीकरीता अर्ज दाखल केला होता तर, पोलीस कोठडी मिळावी या करीता पोलीसांनी सुध्दा प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान पत्रकार संघटनेसह विविध धार्मीक सामाजीक संघटेनेने सुध्दा रोहण हिवळे याच्या विरोधात पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल केले. मंगळवारी (ता.चार) न्यायाधिशांच्या आदेशावरुन पोलीसांनी त्याला येथील फैजदारी व दिवाणी न्यायालयात हजर केले. यावेळी दोन्ही बाजुचे म्हणने एैकुण घेवुन त्यांनी सोमवार (ता.सहा) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पारित केले.
तपासा दरम्यान पोलीस घेणार शोध
रोहण हिवाळे यांनी फेसबुक खात्या करीता “मैथीली पालीवाल” याच नावाचा वापर का केला? या नावाची कोणती व्यक्ती त्याच्या संपर्कात आहे काय?. हे खाते उघडण्याकरीता कोणत्या कंपनीच्या मोबाईलचा वापर केला? फेसबुक खात्यावर पोष्ट टाकतांना त्याला अन्य कोणत्या साथीदारांनी सहकार्य केले काय? या शिवाय अनेक बाबींचा शोध पोलीसांना घ्यावा लागणार असुन वापरण्यात आलेले मोबाईल, सिमकार्ड आदी सुध्दा जप्त करावे लागणार आहे.
आणी संशय बळावला होता
मैथीली पालीवाल या फेसबुक खात्यावर दररोज काहीनाकाही विवादीत व भावना भडकवीणाऱ्या पोष्ट टाकल्या जात होत्या यामुळे दुखवलेल्यांनी शोध घेणे सुरू केले. रोहण हिवाळे सह सामाजीक परिवर्तन वादी लोकांवर निगरानी ठेवल्यागेली. अनेकांवर संशय सुध्दा घेण्यात आला मात्र ठोस पुरावे काही उपलब्ध झाले नाही. याच दरम्यान संभाजी ब्रिगेड संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त फरवरी २५ ला येथील राजीव गांधी स्टेडीयवर कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमात रोहण हिवळे हा तीन दिवस व्यस्त होता या दरम्यान मैथीली पालीवाल या फेसबुक खात्यावर कोणतीच पोष्ट आली नाही आणी कार्यक्रम निपटताच याच कार्यक्रमाची स्तुती करणारी पोष्ट पडली व संशय बळावला.

