महाराष्ट्र

*** सार्वजनीक बांघकाम विभागाचा अजब गजब कारभार मोडकळीस आलेल्या पुलावरच टाकली सहा इंचाची सिमेंट चटाई *** लाखो रुपयाचा केला भ्रष्टाचार *** पत्रकार अरवींद लील्लोरे करणार आंदोलन, नागरीक देणार त्यांना साथ***

*** अभियंत्याच डोक की खोक- नागरिकांचा प्रश्न ***पुल बांधण्याचा हा तर दिखावा- अरवींद लील्लोरे ***

आर्वी,दि.३०:- ठिकठिकाणी भेगा पडल्यामुळे मोडकळीस आलेल्या नांदपुर-लाडेगाव मार्गावरील पुलाला नष्ट करुन नवीन पुल बनवीण्याची परिसरातील नागरिकांची मागणी होती मात्र सार्वजनीक बांधकाम विभागाने जुण्याच पुलावर सहा इंचाची सिमेंट चटाई टाकली. या अजब गजब कारभाराचा परिसरातील नागरीक विरोध करीत असुन पत्रकार अरवींद लिल्लोरे हे आंदोलन करणार आहेत. त्यांना परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने साथ देणार आहेत.

   भष्ट्राचाराने बरबटलेल्या सार्वजनीक बांधकाम विभागाला अजब गजब कारभार करण्याची सवयच लागली आहे. नांदपुर- लाडेगाव मार्गाने शेकडो शेतकरी व नागरीक अवागमन करतात. या मार्गावर असलेल्या पुलाला ठिकठिकाणी भेगा पडल्या असुन पुल मोडकळीस आला आहे. शिवाय लहान आकाराचे पाईप टाकुन हा पुल बनवीला असल्याने पावसाळ्यात सतत पुलावरुन पाणी वाहत राहते. यातुन मार्ग काढण्याकरीता जुने लहान तुटलेल्या अवस्थेत असलेले पाईप काढून नवीन मोठे पाईप टाकुन पुल निर्माण करण्यात यावा अशी परिसरातील नागरीकांची अपेक्षा होती. मात्र सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांने नवीनच शकल काढली. निष्कामी असलेल्या जुण्याच मोडकळीस आलेल्या पुलावर कंत्राटदाराच्या माध्यमातुन सहा इंचाची सिमेंट चटाई टाकुन तात्पुर्ती खाणापुर्ती केली. यात कनिष्ठ अभियंता व मोठ्या अधिकारांच्या घश्यात मोठ्या प्रमाणात मलाई गेल्याच सुध्दा बोलल्या जात आहे.

अभियंत्याच डोक की खोक- नागरिकांचा प्रश्न 

          पावसाळ्यात लगतच्या शेकडो एक्कर शेत शिवारातीलच नव्हे तर परिसरातील पाणी मोठ्या प्रमाणात या पुला खालुन वाहुन जायला पाहिजे मात्र आधीच लहान पाईप टाकुन हा पुल बनवीण्यात आला होता. परिणामी पुराचे अतिरीक्त पाणी पुलावरून वाहत होते यामुळे पुलाची वरची प्रत तर फुटलीच होती शिवाय पाण्याचा मार बसल्याने पुलाला सुध्दा ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाईप अर्ध्या उंची पर्यंत खाली दबला असल्याने हा पुल नष्ट करुन मोठे पाईप टाकुन नवीन पुल बनवीने हाच यावरील एकमेव उपाय होता हे सामान्य माणसाला सुध्दा कळते मात्र उच्च शिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या अभियंत्यांना हे कळु नये या बाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात असुन अभियंत्याच डोक की खोक? असा प्रश्न विचारल्या जात आहे.

पुल बांधण्याचा हा तर दिखावा- अरवींद लील्लोरे

           पुलाचे बांधकाम करतांना मोठे पाईप टाकुन उंची वाढवायला पाहिजे होती जेणे करुन पावसाळ्यात वाहत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह त्यातुन निघाला असता आणी पुलावरुन पाणी वाहत जाण्याची समस्या कायमची मिटली असती. मात्र सार्वजनीक बांधकाम विभागाने प्रवाहाचे पाणी समावुन घेवू न शकणाऱ्या जुण्याच कमी व्यासाच्या पाईपाने तयार केलेल्या  मोडकळीस आलेल्या पुलावरच सिमेंट कॉक्रीटचा थर टाकुन काय साध्य केले? पावसाचे पाणी या पुलावरून वाहनारच आणी समस्या जशीच्या तशीच कायम राहणार मात्र यावर खर्च झालेल्या शासनाच्या लाखो रुपयाला जबाबदार कोण असणार? असा प्रश्न अरवींद लील्लोरे यांचा असुन याची वरीष्ठ स्तरावरुन चौकशी करुन याला जबाबदार असणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करावी. तसेच शासनाची रक्कम सुध्दा वसुल करावी. मोठे पाईप टाकुन उंच पुल बनवीण्यात यावा अशी त्यांची मागणी असुन याकरीता आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button