महाराष्ट्र

***२५ नगरसेवक व नगरसेवीकां सह नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे यांनी स्वीकारला पदभार *** नगर परिषदेच्यावतीने आयोजीत केला होता पदग्रहण समारंभ *** मुख्याधीकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांनी केले सगळ्याचे स्वागत ***

***मुख्याधिकारी डॉ. सुकलवाडकर यांनी सोपवीला पदभार***

आर्वी,दि.४:-क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचीत्य साधुन येथील नगर परिषदेच्यावतीने शनिवारी (ता.तिन) पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात नवनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे यांच्यासह २५ नगरसेवकांनी पदभार स्वीकारला असुन त्यांचे मावळते प्रशासक तथा विध्यमान मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांनी आदरपुर्वक स्वागत केले.

या वेळी जेष्ठ समाजसेवक तथा माजी नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुल्हाणे, आमदार सुमीत वानखेडे, ॲड. क्षीतीजा वानखेडे, नवनिर्वाचीत अध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे, भाजपचे गट नेते संजय थोरात, विरोधी पक्ष नेते प्रा. पंकज वाघमारे, भाजपचे शहर अध्यक्ष राहुल गोडबोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप पोटफोडे, मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर हे मंचवर विराजमान होते.

   यावेळी मार्गदर्शन करतांना माजी नगराध्यक्ष डॉ.वसंतराव गुल्हाणे यांनी शहराला बऱ्याच वर्षा नंतर नगराध्यक्ष नगरसेवक मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला. तसेच शहराच्या विकासा करीता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देतील अशी अपेक्षा आमदार सुमीत वानखेडे यांकडुन व्यक्त केली.

    आमदार सुमीत वानखेडे यांनी मागदर्शन करतांना, शहराच्या नागरिकांनी नगराध्यक्ष  व नगरसेवक पदावर निवडुण देवुन शहराची जबाबदारी सोपवीली आहे असे सांगून याचे सर्वांनी पालन करावे अशी समज दिला. तसेच आपले कर्तव्य पार पाडतांना सगळ्यांनी एकत्र येवुन काम केले तर येत्या पाच वर्षात शहर सर्वात सुंदर आणी स्वच्छ शहर झाल्या शिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करुन शहराच्या विकासा साठी, नागरिकांसाठी काम करुन या माध्यमातुन जनसेवा साधावी असे सांगीतले.

    नवनिर्वाचीत नगराघ्यक्षा स्वाती गुल्हाणे  यांनी सत्काराला उत्तर देतांना, अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारतांना अभिमान व नम्रता वाटत असल्याचे सांगुन मतदारांनी व पक्षाने विश्र्वास टाकल्याबाबत आभार मानले.  तसेच हे एक पद नसुन माझ्यावर टाकलेली जिम्मेदारी आहे ही जिम्मेदारी पारपाडतांना नगर सेवकांना सोबत घेवुन काम करील असे आश्वासन दिले.

ॲड. क्षीतीजा वडतकर यांनी मार्गदर्शन करतांना, आपल्याकडे सोपवीलेल कर्तव्य हे ओझ वाटु नये अस नवनिर्वाचीत प्रतीनिधीला एका गोष्टीच्या माध्यमातुन समाजावुन दिलं. तसेच आपल्याला या कर्तव्याला जगायच आहे अस सांगुन श्रीकृष्णाने सारस्व केलं आहे आणी आज श्रीकृष्णाचे अर्जुन म्हणुन तुम्हाला जबाबदारी पार पाडायची आहे याची जाणीव करुन दिली.

   विरोधी पक्ष नेते प्रा. पंकज वाघमारे यांनी मार्गदर्शन करतांना, शहराच्या विकासात्मक कामाला आमचा पाठींबा राहील विरोधाला विरोध अस कधीही होणार नाही. शहराचा विकास हेच आमच्याकरीता प्रथम कर्तव्य राहणार असल्याची ग्वाही दिली. तसेच विरोधी पक्ष नेता म्हणुन गट नेता म्हणुन माझ्याकडून पुर्ण सहकार्य राहील तुम्ही पण आमच्याकडे लक्ष द्याल, काही फुल नाही तर फुलाची पाकळी आमच्या प्रभागा करीता वार्डा करीता द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली.

याशिवाय दिलीप पोटफोडे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे संचालन कर अधिक्षक गणेश खडके यांनी करुन आभार मानले.

तत्पुर्वी आमदार सुमीत वानखेडे यांच्या नेतृत्वात भाजपच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्षा व नगरसेवक, नगरसेवीका ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने नगर परिषद प्रशासकीय भवनात पोहचले. या दरम्यान त्यांनी रामदेव बाबा मंदिर, गणपती मंदिर, तेलंगराय महाराज आदिंचे पुजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.

कार्यक्रमाचे संचालन कर अधिक्षक गणेश खडके यांनी करुन आभार मानले तर, कार्यक्रमाला भाजप, शिवसेना, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवाद काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस आदि पक्षाचे पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मुख्याधिकारी डॉ. सुकलवाडकर यांनी सोपवीला पदभार

          या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांनी नवनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे यांना अध्यक्ष पदाचा पदभार सोपवीला तसेच नगराध्यक्षासह भाजपचे लवेश गलोले, देवीदास साठे, मनोज आगरकर, कांता कसर, संजय थोरात, सौ. संपदा जोशी, जगन गाठे, सौ. शुभांगी गाठे, अजय कटकमवार, सौ. उषा सोनटक्के, संजय राऊत, उर्मीला पवार, गौरव जाजु, खान महताब खातुन. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) चे सौ. शितल मोहोड, गोवींदा उईके, सुधीर जाचक, सौ. वंदना देवघरे, सौ हेमलता जाधव, नितीन लोहे, सौ. प्रतीभा गिरी. काँग्रेसच्या सौ. प्रियंका भिमके, प्रा. पंकज वाघमारे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. भारती पोटफोडे. शिवसेना (उबाठा) चे योगेश उर्फ गुड्डु गावंडे या नवनिर्वाचीत नगरसेवक व सेवीकांचा पुष्पगुच्छ देवुन व संवीधान भारतीय संवीधानाच्या उद्दीष्टांची फ्रेम देवुन सत्कार केला.

         

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button