महाराष्ट्रसामाजीक

विविध क्षेत्रात सामाजीक कार्य करणाऱ्या मनिष ठाकरे यांचा “विदर्भवीर पुरस्काराने” सन्मान

हा माझा नाही तर स्वयंसेवकांचा सन्मान आहे – मनिष ठाकरे

आर्वी,दि.५:- समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणी वन्यजीव संरक्षण आदि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी बजावणाऱ्या येथील पर्यावरण बचाव समितीचे सचीव मनिष माणीकराव ठाकरे यांचा नागपुर येथील वाइल्ड लाईफ वेल्फेर अँड एन्व्हायर्नमेंट सोसायटीच्यावतीने आयोजीत भव्यदिव्य अशा सोहळ्यात “विदर्भवीर पुरस्कार” देवुन सन्मान करण्यात आला आहे.

मनिष ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण, वन्यजीवाचे रक्षण करणे आदिं विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी तर केलीच आहे. शिवाय जखमी व अपघातग्रस्त प्राण्यांचे प्राण वाचवुन त्यांचे पुनर्वसन करण्याचे मोलाचे कार्य सुध्दा केले आहे, ऐवढ्यावरचे ते थांबले नाही तर, नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी निस्वार्थ भावनेने सेवाकार्य करुन परिसरात एक आपला आगळावेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी पासुन अनेक प्राणीमित्र व पर्यावरणप्रेमींना एक नवी दिशा व प्रेरणा मिळाल्या शिवाय राहणार नाही.

या कार्यक्रमाला विदर्भातील सामाजीक, पर्यावरणीय व स्वयंसेवी क्षेत्रात काम करणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

या सन्मानामुळे आर्वी तालुका व वर्धा जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. मनिष ठाकरे यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हा माझा नाही तर स्वयंसेवकांचा सन्मान आहे

       “हा सन्मान माझा नसून समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक प्राणीमित्र, पर्यावरणप्रेमी व स्वयंसेवकांचा सन्मान आहे. भविष्यातही निसर्ग आणि पर्यावरण संरक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करत राहण्याचा संकल्प मी घेत आहे.” असा शब्द मनिष ठाकरे यांनी सत्काराला उत्तर देतांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button