महाराष्ट्रसामाजीक

***आर्वीच्या इतीहासात खोवला एक मानाचा मुजरा***“विदर्भ विर” पुरस्काराने केला, पर्यावरण बचाव समितीच्या प्राणी मित्रांचा सन्मान***

आर्वी,दि.६:- समाज कार्याचा वसा घेवुन गत अनेक वर्षा पासुन पर्यावरणाच्या संरक्षणा करीता वाहुन घेणाऱ्या तसेच वनजीवांच्या रक्षणा करीता स्वत:च्या प्राणाची बाजी लावणाऱ्या येथील पर्यावरण बचाव समितीच्या प्राणी मित्रांचा नागपुर येथील वाईल्डलाईफ वेलफेअर संस्थेच्यावतीने “विदर्भ विर पुरस्कार २०२६” देवुन सन्मान करण्यात आला. यामुळे शहराच्या इतीहासात अजुन एक मानाचा मुजरा खोवल्या गेला असल्याने आनंद तर व्यक्त केल्याच जात आहे शिवाय पर्यावरण बचाव समिती सदस्य व प्राणी मित्रांवर अभिनंदनाचा वर्षाव सुध्दा होत आहे.

विदर्भातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व वन्यजीव, मुके प्राणी  तसेच पशुपक्षी व निसर्गाच्या संरक्षणा साठी झटणाऱ्या समाजसेवकांसह पत्रकारांचा सन्मान करण्याच्या व पुस्तक प्रकाशन करण्याच्या उद्देशाने वन्यजिव रक्षक सन्मान सोहळ्याचे नागपुर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात रवीवारी (ता.चार) आयोजन करण्यात आले होते. यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, अविनाश महालक्ष्मे, इर्शाद शेख, वन विभागाचे उप संरक्षक अधिकारी संदिप भारती, वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले, वनिता तिरपुडे, श्रीकांत आगलावे, डॉ सागर पांडे, डॉ. राजा गोरे, डॉ. किरण पुरंदरे आदि या कार्यक्रमाचे प्रमुख अतीथी होते.

या कार्यक्रमात पर्यावरण बचाव समिती व प्राणी मित्र आर्वीचे अध्यक्ष शुभम जगताप, गौरव ठाकुर, संकेत वनस्कर, मनिष ठाकरे, संतोष पडोळे, नितेश बेलेकर, आनंद काळे, संकेत मनोरे, कार्तीक कातोडे, ललित वांगे, नयन थिगळे, प्रितम गायकी, नयन चौधरी, साहील ठाकरे, निखील खडसे, वैभव मेंढे, आयुष सातपुते, गणेश काळे, गौरव कौरती, कुणाल डोंगरे यांनी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलेला “विदर्भ विर” पुरस्कार, सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र स्वीकारला.

या प्रसंगी वाईल्डलाईफ वेलफेअर संस्था नागपुर चे सचिव नितेश भांदक्कर यांनी लेखन केलेल्या “सर्पदंश एक व्यथा” या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

हा सन्मान आमचा नसुन आर्वीकरांचा आहे

        हा सन्मान आमचा नसुन ज्यांनी आम्हाला पावलोपावली योग्य वेळेवर प्राण्यांच्या बचावाकरीता मदत करुन आमचा उत्साह वाढवीला त्या आर्वी करांचा असुन  प्राणीसेवा व निसर्ग संगोपन हाच आमचा धर्म  व पशुसेवा हिच आमची ईश्वर सेवा” असल्याचा ठाम निर्धार प्राणी मित्रांनी सत्काराला उत्तर देण्याता व्यक्त केला तसेच सोसायटीच्या पदाधीकाऱ्यांचे व आयोजकांचे आभार मानले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button