महाराष्ट्र

*** आरोग्य सेवेच्या माध्यमातुन समाज सेवा करणाऱ्या डॉ. विनय देशपांडे यांची *** स्वीकृत सदस्य म्हणुन निवड करा, शहरवासीयांची मागणी ***

आर्वी,दि.८:- आरोग्य सेवेच्या माध्यमातुन समाजसेवेचे व्रत पाळणारे डॉ. विनय देशपांडे यांची नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाकरीता निवड करण्यात यावी अशी मागणी शहरातील सर्व पक्षाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.

नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागुन दोन आठवडे झाले. नगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेवीकांनी पदभार सुध्दा सांभाळला. आता नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभपती पदाकरीता व उपाध्यक्ष पद मिळवीण्याकरीता तडजोड सुरू झाली असली तरी शहरवासीयांचे सर्वात जास्त लक्ष स्वीकृत सदस्य कोण होणार याकडे लागले आहे. माजी नगर सेवकांपासुन तर समाजसेवक, डॉक्टर, वकील अनेकांनी आपले घोडे दामटणे सुरु केले आहे. मात्र अशात सुध्दा पुर्वीची राजकीय पार्श्वभुमी असलेल्या तथा आरोग्य सेवेच्या माध्यमातुन सामाज सेवा करणाऱ्या डॉ. विनय देशपांडे यांच नाव जनमानसातुन पुढे येत आहे.

गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा पुर्वीण्याची देशपांडे परिवाराची पुर्वापार परंम्परा आहे याशिवाय डॉ. विनय देशपांडे यांचे वडील स्व. डॉ. शरद देशपांडे हे सुध्दा नगर परिषदेचे नगरसेवक होते. वैध्यकीय सेवा असो अथवा इंडियन रेडक्रास सोसायटी असो या माध्यमातुन शहरातील गोरगरीब जनतेसोबत त्यांची नाळ तर जुळली आहेच शिवाय वर्धा नागरी बँकच्या माध्यमातुन प्रशासकीय कारभाराचा त्यांना दांडगा अनुभव आहे. आपल्या जवळचा व्यक्ती आपले प्रश्न नगर पालीकेत उचलुन धरतील व नगर सेवकांवर सुध्दा त्यांचा अंकुश राहिल असा ठाम विश्वास शहरातील नागरिकांमध्ये असल्यामुळे राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, समाजसेवक तथा गोरगरीब नागरिकांमधुन डॉ. देशपांडे यांचीच स्वीकृत सदस्य पदी निवड व्हावी अशी मागणी उत्सफुर्त पणे जोर धरत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button