*** नेताजी वार्डातील बोळ झाली बाथरुम *** नागरीक झाले त्रस्त *** परिसरातील नागरीकांनी केली नगर परिषदेकडे तक्रार*** बोळच बंद करण्याचा दिला इशारा ***
आर्वी,दि.९:- आठवडी बाजारा लगत नेताजी वार्ड मधील रहवासी परिसरात असलेल्या बोळीचा असामाजीक तत्वाच्या लोकांनी लधुशंकेकरीता वापर करुन चक्क बाथरुमचेच स्वरुप दिले आहे. मात्र यामुळे परिसरातील नागरीक त्रस्त झाले असुन त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांना निवेदन देवुन कारवाई करण्याची मागणी केली अन्यथा ती बोळ आम्ही कायमची बंद करु असा इशारा दिला आहे.


आठवडी बाजारा लागत मनीष बॅग हाऊस व तळेकर यांच्या घराच्या मधामधुन लोकांच्या वहीवाट करण्याकरीता पाच फुटाची बोळ सोडलेली आहे. या बोळीचा नेताजी वार्डातील नागरीक जाण्यायेण्याकरीता उपयोग करता. तसेच महिला सुध्दा या वाटेने जातयेत असताता. मनीष बॅग हाऊस आदि व्यवसायीक प्रतीष्ठण सुघ्दा आहे. येथे महिलांची वर्दळ असते. मात्र याचा विचार न करता असामाजीक तत्वाचे लोक या गलीचा उपयोग लघु शंकेकरीता करतात. अनेक वेळा त्यांना मनाई सुध्दा केली मात्र ते मनाई करणाऱ्यांलाच शिवीगाळ करुन मारहान करण्याचा प्रयत्न करतात. हा रहवासी परिसर असुन सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाण वास परिसरात पसरत असल्याने घरात बसणे सुध्दा कठीण झाले आहे. शिवाय मच्छरांचा उपद्रव सुध्दा वाढलेला आहे. यातुन आमची सुटका करण्याकरीता कडक कारवाई करावी अन्यथा आम्हाला ती बोळच बंद करावी लागेल असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख मनीष अरसड यांनी निवेदनातुन दिलेला आहे.




