*** आर्वी नगर परिषदेच्या विषय समितीचे झाले गठण *** उपाध्यक्ष गौरव जाजु यांना शिक्षण समिती तर, जगण गाठे, संजय राऊत, संजय थोरात, अजय कटकमवार, सौ. भारती पोटफोड यांची सभापती पदी झाली निवड ***
आर्वी,दि.२०:- जिल्हाधिकारी वर्धा यांच्या निर्देशानुसार मंगळवारी (ता.२०) घेण्यात आलेल्या विशेष साधारण सभेमध्ये विषय समित्यांचे गठण करण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या या विशेष सभेत उपाध्यक्षाकरीता शिक्षण समिती राखीव ठेवण्यात आली असुन या समितीचे अध्यक्ष गौरव जाजु हे राहणार आहेत. तर, नगर विकास व नियोजन समितीच्या सभापती पदावर जगन गाठे, बांधकाम समितीच्या सभापती पदावर संजय राऊत, आरोग्य समितीच्या सभापती पदी पदावर संजय थोरात, पाणी पुरवठा समितीच्या सभापती पदावर अजय कटकमवर, तर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. भारती पोटफोडे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रत्येक समीती ही सहा सदस्यांची असुन प्रत्येक समिती मध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.), काँग्रेस व शिवसेनाउबाठा) च्या दोन दोन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
आमदार सुमीत वानखेडे, नगराध्यक्षा सौ. स्वाती गुल्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप पोटफोडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव आदिंनी समीती सभापती व सदस्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत.
या विशेष सभेचे पिठासीण अधीकारी उपविभागीय अधिकारी विश्र्वास शिरसाठ हे होते. तर, मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर, उपमुख्याधिकारी मदन लाडेकर तथा नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
उपाध्यक्ष गौरव जाजु
लॅड डेव्हल्पमेंट सोबतच सामाजीक कार्याला वाहुन घेणारे गौरव जाजु हे प्रथमच नगर परिषदेच्या राजकारणात उतरे आणी आमदार सुमीत वानखेडे यांनी त्यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. त्यांचे पणजोबा खुशालचंद जाजु, आजोबा विठ्ठलदास जाजु हे सुध्दा नगर सेवक होते. जाजु परिवाराने पुर्वी पासुनच जनसेवेचा विडा उचलला असुन आता गौरव जाजु यांचेवर शिक्षण विभागाची जबाबदारी आलेली आहे.
सभापती जगन गाठे
जगन गाठे हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असुन त्यांनी राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटनेची धुरा अनेक वर्ष यशस्वीपणे सांभाळली आणी नौकरीवरुन कार्यमुक्त झाल्या नंतर नगर परिषदेच्या राजकारणात उतरले. त्यांनी या पुर्वी सुध्दा सभापती पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना पक्ष संघटनेचा गाढा अनुभव आहे. आता त्यांचेवर नगर विकास समीतीची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
सभापती संजय राऊत
संजय राऊत हे व्हॉलीबॉल पटु असुन महावीध्यालयीन निवडणुकी पासुनच त्यांनी राजकारणात उडी घेतली आहे. यापुर्वी सुध्दा ते नगर परिषदेच्या विविध विषय समितीचे सभापती राहुन चुकले आहे. बांधकाम सभापती पदाची जबाबदारी मिळावी हि त्यांची यावेळी इच्छा होती आणी या माध्यमातुन त्यांची इच्छा पुर्ण झाली आहे. आमदार सुमीत वानखेडे यांनी त्यांचेवर बांधकाम समितीच्या सभापती पदाची जबाबदारी सोपवीली आहे.
सभापती संजय थोरात
संजय थोरात यांनी सुध्दा महाविध्यालयीन निवडणुकीच्या माध्यमातुन राजकारणाचे धडे घेतले. युवक पॅनल पासुन तर भाजप पर्यंत त्यांचा प्रवास सुरू आहे. यापुर्वी सुध्दा त्यांनी नगर परिषदेच्या विविध विषय समितीच्या सभापती पदाची जबाबदारी साभाळली आहे. आता त्यांना आरोग्य समितीची जबाबदारी सांभाळावयाची आहे.
सभापती अजय कटकमवार
अजय कटकमवार हे दुसऱ्यांदा नगर परिषदेमध्ये निवडूण आले आहे. त्यांनी सुध्दा या पुर्वी नगर परिषदेच्या विविध समितीच्या सभापती पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सुध्दा कबड्डीचे पट्टीचे खेळाडू आहेत. त्यांचेवर यावेळी पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सभापती सौ. भारती पोटफोटे
सौ. भारती पोटफोडे ह्या प्रथमच नगर परिषदेच्या राजकारणात उतरल्या आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप पोटफोडे यांच्या अर्धांगीनी असुन त्यांच्या रुपाने तब्बल १५ वर्षा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला नगर परिषदे मध्ये प्रतिनीधीत्व करण्याचीसंघी मिळाली आहे. प्रथमच निवडुण आल्या आणी त्यांना महिला व बाल कल्याण समितीचे सभापती पद मिळाले आहे. या माध्यमातुन महिलांकरीता नवनवीन योजना निर्गमती करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
