*** जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान व राष्ट्रिय युवा उदय संस्था नागपुर यांच्यावतीने कारंजा (घा.) शनिवारी (ता.२४) भव्य नेत्र तपासणी व आरोग्य शिबीराचे आयोजन ***
कारंजा (घा.), दि.२३:- जन सामान्यांना आरोग्य सुविधा देण्याकरीता नागपुर येथील जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान व राष्ट्रिय युवा उदय संस्थेच्यावतीने शनिवारी (ता.२४) भव्य नेत्र तपासणी व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन आमदार सुमीत वानखेडे हे करणार असुन तज्ञ डॉक्टरांची मोठी चमु या शिबीरात आपली सेवा देणार आहेत.
कारंजा (घाडगे) येथील स्व. राजीव गांधी मेमोरीयल इंग्लिश हायस्कुल येथे आयोजीत या भव्य आरोग्य शिबीरात. रक्तदाब, शुगर, ताप, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, हृदय रोग, किडनी, मेंदु ज्वर, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्यांचे आजार, मुतखडा, पोटाचे आजार, थॉयरॉईड, बालरोग, मतिमंद मुलांचे आजार, कुपोषण, डोळ्यांचे आजार, तिरळेपणा, स्त्री रोग, कान, नाक, घसा, मनक्याचे आजार, पायाचे आजार, हाडांचे आजार, त्वचा रोग, मुख रोग आदि विविध आजाराची तपासणी विनामुल्य करण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध औषीधी व तिनशे रुग्णांना चष्म्याचे वितरण होणार आहे.
शिबीरात सहभागी होवु इच्छीणाऱ्यांनी विलास वानखेडे, रोशन चौधरी, हरिभाऊ धोटे, हरिश भांगे,शिरिष भांगे, यादवरावजी भांगे, राजुभाऊ वंजारी, प्रा. जनार्दनजी धोटे, संदीप भांगे, प्रदीपकुमार ऊके, दिलीप जसुतकर,रजनी धांदे, मिनाताई ऊईके, संदीप भिसे यांच्या सोबत संपर्क करावा असे आवाहन नागपुर येथील जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान च्या संयोजीका तथा राष्ट्रीय युवा उदय संस्थेच्या अध्यक्षा अरुणाताई चाफले यांनी केले आहे.
या शिबीरात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होवुन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.