*** राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत *** आर्वीच्या खेळाडूंची भरारी *** दोन रजत व सहा कास्य पदकाचे ठरले मानकरी ***
आर्वी,दि.२४:- राज्याच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत सांगली जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व सांगली जिल्हा थायबॉक्सिंग असोसिएशनच्या संयुक्त विध्यमाने, मनेराजुरी येथे राज्यस्तरीय दोन दिवशीय थासबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात येथील खेळांडूनी चांगलीच भरारी मारली असुन दोन रौप्य व सहा कास्य पदकाचे ते मानकरी ठरले आहेत. यशस्वी खेळाडुंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शनिवारी (१७) व रवीवारी (१८) झालेल्या या स्पर्धेचे प्रमुख अतिथी सांगलीचे जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवेडकर, राष्ट्रीय थायबॉक्सींग असोशिएनचे अध्यक्ष पाशा अत्तार. महाराष्ट्र थायबॉक्सींग फेडरेशनचे कार्याध्यक्ष विशाल माळी हे होते.
१७ वर्षाच्या आत व १९ वर्षाच्या आत या दोन वयोगटात विभागुन ह्या स्पर्धा घेण्यता आल्या होत्या. १७ वर्ष वयोगटातील स्पर्धेत वैष्णवी जयस्वाल हिने रौप्य पदक, दिशा गोतमारे, रिदा नाज, कार्तीक चौकडे, आदर्श लवटे, अनुराग भुयार यांनी कास्य पदक पटकावीले. तर, १९ वर्ष वयोगटातील स्पर्धेत आर्यांश वडणारे यांने रौप्य तर, वृतुंबरा कळंबे हिने कास्य पदक पटकावीले आहे.
या यशस्वी खेळाडुंचे वर्धा थायबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम मोहिते, उपाध्यक्ष नरेश वडणारे, सचीव सलीम शेख, सहसचिव मो. मोहिन शेख आदिंनी अभिनंदन करुन पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत.
खेळाडुंनी आपल्या या यशाचे श्रेय प्रशिक्षक मोहम्मद सलीम व पालकांना दिले आहे.


