खेळ

२० दिवशीय कराटे प्रशिक्षण शिबीराचे समारोप, या शिबीरात ६० विध्यार्थ्यांनी गिरवीले कराटे खेळाचे डावपेचाचे

आर्वी,दि.५:- थायबॉक्सींग एसोसिएशन वर्धाच्यावतीने, येथील तालुका क्रिडा संकुलावर २० दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबीरात ६० विध्यार्थ्यांनी तज्ञ प्रशिक्षकाकडून कराटे खेळातील विविध डावपेचाचे धडे गिरवीले. या शिबाराचे रवीवारी (ता. तिन) समारोप झाले.

या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्वी नगर परिषदेच्या नगराघ्यक्षा सौ. स्वातीताई गुल्हाणे ह्या होत्या तर, उपाध्यक्ष गौरव जाजु, नगर सेवक मनोज आगरकर हे प्रमुख अतिथी होते.

१० एप्रील पासुन तर ३० एप्रील पर्यंत चालेल्या या शिबीरात प्रशिक्षक सेंसई मोहम्मद सलीम यांनी शिबीरार्थींना लाठीकाठी फिरवीणे, काठीच्या माध्यमातुन आपल्या बचावा करीता हमला करणे, मजबुत अंग्रेजी कवेलू तथा स्टाईल हाताने तोडणे, निशस्त्र असतांना स्वत:ला वाचवीत हाणामारी (फाईटींग) करणे आदिंचे प्रशिक्षण उत्कृष्ट रित्या दिले. यामुळे शिबीरार्थींमध्ये एक प्रकारे वेगळीच उर्जा निर्माण झाली आहे.

या प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन रिदा नाज यांनी केले तर वैदेही जगताप हिने आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता अयोश वडणारे, सौरभ लवटे, धिरज महाजन, राहुल तराळे आदिंनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button