ग्रामविकास योजनाशेती विषयक

…….अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला आले यश, तब्बल ५० वर्षानंतर झाला शिवपांदन रस्ता मोकळा.

नायब तहसीलदार, तलाठी व भुमी अभिलेख अधिकाऱ्यांनी दिला होता खोटा अहवाल

आर्वी,दि.१७ :- आपल्या राजकीय व प्रशासकीय संबंधाच्या माध्यमातुन गेल्या ५० वर्षा पासुन अडवुन  ठेवलेला देऊरवाडा शिवारातील दौलतपुर मौज्यातील शिवपांदन रस्ता प्रशासनाने मोकळा करुन दिला आणी अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश प्राप्त झाले आहे.

लगतच्या देऊरवाडा शिवारातील दौलतपुर मौज्यामध्ये सौ. राखी कदम व विलास पंजाबराव कदम यांचे शेत आहे, आणी यांच्या शेतामधुनच शिवपांदन रस्ता आहे. राखी कदम यांचे सासरे दिगांबर कदम हे या मौजाचे तलाठी व मंडळ अधिकारी म्हणुन कार्यरत होते याच जोरावर गत ५० वर्षा पासुन कदम परिवाराने शिवपांदन रस्ता अडवुन धराला होता. यामुळे बाधीत झालेल्या सुमारे २५ शेतकऱ्यांनी महसुल विभागाकडे याची तक्रार केली. नायब तहसीलदार सोरते, तत्कालीन मंडळ अधिकारी राठोड, भुमी अभिलेख कर्मचारी आदिंनी चौकशी करुन शिवपांदन एकमेकावर चढली असल्याने व रस्त्याचे माप नसल्याने रस्ता मोकळा करता येणार नाही असा चुकीचा अहवाल दिला.

परिणामी त्रस्त झालेल्या प्रकाश मारोतराव भाकरे व इतर १४ बाधीत शेतकऱ्यांनी याविरुध्द प्रशासनाकडे अर्ज दाखल केला सोबतच जिल्ह्याचे पालक मंत्री पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे, आमदार सुमीत वानखेडे यांना सुध्दा निवेदन देवुन आपली बाजु समजावुन सांगीतली व २०२३ पासुन आपला लढा सुरूच ठेवला. परिणामी प्रशासकीय यंत्रणा जागृत झाली. सखोल चौकशी झाली आणी अखेर गुरूवारी (ता.१४)  तहसीलदार हरीश काळे, नायब तहसीलदार आऊलवार, नांदपुर देऊरवाडा ग्राम महसुल अधिकारी लताड, सौ. पुनसे, भुमी अभिलेख विभागाचे मस्के, बारई तथा पोलीस कर्मचारी आदींच्या उपस्थीतीमध्ये वादी, प्रतीवादी व अनेक नागरिकांच्या समोर वादग्रस्त शिवपांदन रस्ता मोकळा करुन दिला.

अखेर ५० वर्षा नंतर न्याय मिळाल्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. आता पुढे शेतकामे करण्याकरीता सोयसीकर होणार असल्याने मानसीक त्रासामधुन या निर्णयामुळे आमची सुटका झाली आहे, असे त्यांनी प्रतिक्रीया देतांना सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button