हिवरा येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती उत्साहात साजरी, सामान्य परिवारातल्या रुतीका घोटकर हिने सनदी लेखापाल परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.

आर्वी,दि.२७:- कोल्हापुर संस्थानाचे एक महान द्रष्टे राजे आणी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, शोषित , वंचीत, आणी मागासलेल्या बहुजन समाजाचे उध्दारक ‘अरक्षणाचे जनक’ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती हिवरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळेत शुक्रवारी (ता.२६) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण हे होते. तर मुख्याध्यापक ताजने, जेष्ठ शिक्षक अवीनाश टाके, सुरेश निनावे, प्रफुल कांबळे हे प्रमुख अतिथी होते.
यावेळी विध्यार्थ्यांनी समुहगीते सादर करुन शाहु महाराजाचे गुणगाण करुन शाहु महाराजांनी केलेल्या कार्यावर आपले विचार प्रगट केले. इयत्ता सातवीच्या विध्यार्थीनीने ‘शाहु महाराजांचे विचार व आजची पिढी’ या विषयाची प्रभावीपणे मांडणी केली.
कार्यक्रमास शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने व विध्यार्थ्यांना खाऊ देवुन झाली.

सामान्य परिवारातल्या रुतीका घोटकर हिने सनदी लेखापाल परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.
आर्वी येथील सामान्य परिवारात वाढलेल्या रुतीका घोटकर हिने अथक परिश्रम घेवुन सनदी लेखापाल (सीए) परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे तिचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आर्थीक परिस्थीती जेमतेम असलेल्या सामान्य परिवारात वाढलेल्या रुतीका घोटकर हिने वाणीज्य शाखेतील सनदी लेखापाल (सीए) परिक्षा पास करायचीच हाच एकमेक उद्देश डोळ्यापुढे ठेवुन प्रचंड परिश्रम घेतले परिणामी यश तिच्या पदरात पडले. याकरीता तिची जिद्द , सातत्य, आत्मविश्वास आणी रात्रंदिवस घेतले परिश्रम फळास आले.
रुतीका हिने आपल्या या यशाचे श्रेय आई, वडील, आजी तथा परिवाराला देवुन याकरीता मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सुध्दा आभार मानले आहे.



