शेती विषयक

गुजरात मधील बोगस बी-बियाणे पोहचले आर्वीत. २९ लाख ४६ हजार रुपयाचा माल जप्त. साठवणुक करणाऱ्यास अटक. कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षकाची कारवाई .

गत अनेक वर्षा पासुन बोगस बी-बीयाण्याचा व्यवसाय, मात्र प्रशासन झोपेत

आर्वी,दि.२७:- जसजसे पेरणीचे दिवस जवळ जवळ येवु लागले आहे तसेतसे ग्रामीण भागातील मध्यस्थीला पकडुन बोगस बी-बियाणे विक्रीचे जाळे सुध्दा विनल्या जात असल्याचे दिसुन येते. थेट गुजरात मधील ॲग्रोटेक कंपनीचे बि-बियाणे लगतच्या शिरपुर (बोके) येथील गोदामात पोहचले. याची कुणकूण लागताच पंचायत समितीच्या कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षकाने पोलीसांच्या मदतीने कारवाई केली. तब्बल २९ लाख ४६ हजाराचा माल जप्त तर केलाच शिवाय साठवणुक करणाऱ्यास अटक सुध्दा केली आहे.

संजय मारोतराव गोपाळे (३२) असे आरोपीचे नाव असुन तो शिरपुर (बोके) येथील रहिवासी आहे. हा गत तिन चार वर्षा पासुन कृषी सेवा केंद्र चालवीतो आणी याच माध्यमातुन बंदी असलेल्या बोगस बि-बियाण्याची सुध्दा विक्री करतो. त्याचे सोबत गुजरात मधील राजकोट जिल्ह्यातील पाढंरी तालुक्यातील तारगडी येथील पानम ॲग्रोटेक बि/एच पटेल समाज कंपनीने संबंध प्रस्थापीत केले, आणी महाराष्ट्रात बंदी असलेल्या बि-बियाण्याची मोठ्या प्रमाणत विक्री सुरू केली. या बिनी बोभाट सुरू असलेल्या कारभाराची माहिती एका सजग शेतकऱ्यांनी येथील पंचायत समीतीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रक संजय बनमोटे यांना दिली आणी बोगस बि-बीयाणे विक्रीचे बिंग फुटले. त्यांनी बुधवारी (ता.२७) पोलीसांना सोबत घेवुन थेट गादामवरच धाड टाकली आणी सुमारे २९ लाख ४६ हजार रुपयाचे विक्रीस बंदी असलेले बि-बीयाणे जप्त केले.

वर्धा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रावाल, अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत ढोले, यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सतिश डेहणकर, पो.उपनिरीक्षक संतोष चव्हाण, पो. हवा. दिगांबर रुईकर, अंकुश निचत, ऋृषीकेश घंगारे, पो.अ. सुरजसिंग बावरी, सागर पाचोडे, सुरज रिते, संजय बोकडे, बालाजी मस्के, प्रशांत नरबरीया आदिंनी हि कारवाई केली.

या प्रकरणी संजय गोपाळे याचे विरुध्द पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद घेवुन अटक केली असुन पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

गत अनेक वर्षा पासुन बोगस बी-बीयाण्याचा व्यवसाय, मात्र प्रशासन झोपेत

          बाहेर राज्यातील बंदी असलेले बि-बियाणे महाराष्ट्रत गत अनेक वर्षा पासुन येत आहे. यातुन हजारो शेतकऱ्यांची लुबाडणुक होत आहे. मात्र प्रशासनाला याची माहिती नसने या बंद्दल आश्चर्यच वाटते. शासनाने यावर नियंत्रण ठेवण्याकरीता समिती निर्माण केलेली आहे. असे असतांना सुध्दा बाहेर राज्यातील बोगस बि-बीयाणे राज्यात येतातच कसे हे सर्वात मोठे कोडे आहे. प्रशासकीय अधिकारी, कृषी विभाग, पोलीस यंत्रणा झोपली आहे की, यांचा सुध्दा यात सहभाग आहे. असा शेतकरी वर्गा कडुन प्रश्न निर्माण केल्या जात आहे. जर एका सजग शेतकऱ्याने याची सुचना दिली नसती तर हा व्यवसाय बिनबोभाट सुरू राहिला असता. असही बोलल्या जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button