निवेदन

नगर परिषदेला एखाद्याचा जिव गेला तरच जाग येईल काय?, गत चार वर्षा पासुन सतत तक्रार, मात्र विहीरीच तोंड बांधायची तसदी घेतली नाही.

खासदार अमर काळे व आमदार सुमीत वानखेडे यांना नागरिकांनी दिले निवेदन

आर्वी,दि.३१:-अडचणीच्यावेळी परिसरातील नागरिकांची पाण्याची सोय भागविणाऱ्या चेरी ले-आऊट मधील विहीरीचे तोंड बांधुन देण्याची मागणी गत चार वर्षा पासुन होत आहे. मात्र नगर परिषद याची दखल घेत नसल्याने एखाद्याचा जिव गेल्यानंतरच नगर परिषदेला जाग येईल काय? असा प्रश्न पडला असुन नागरिकांनी थेट खासदार अमर काळे व आमदार सुमीत वानखेडे यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले.

नगर परिषद हद्दीत येत असलेल्या दत्तवाडी चेरी ले-आऊट मधील खुल्या जागेवर पुर्वी पासुनची विहीर आहे. कालाओघाने या विहीरीच्या तोंडावरील बांधकाम खचल्यामुळे जमीन लेवल झालेली आहे. आजुबाजुला झाडे झुडपे व गवत वाढल्यानंतर हि विहीर दिसुन येत नाही. अशा परिस्थीतीमध्ये विहीरी लगत खुल्या जागेवर खेळणारी लहान बालके तथा या परिसरात फिरणारी गुऱ्हेढोरे या विहीरीत पडून जिवीत हाणी होवु शकते.

            दत्तवाडी चेअरी ले-आऊट परिसरातील नागरीक गत तिन वर्षा पासुन याची तक्रार नगर परिषदेकडे करीत आहे. अनेक वृत्तपत्रात याच्या बातम्या सुध्दा प्रसीध्द झाल्या आहेत. मात्र नगर परिषद प्रशासनाला जाग आली नाही. एकच रस्ता प्रत्येक दोन वर्षाने फोडून पुन्हा बांधण्याकरीता नगर परिषदेकडे निधी येतो. मात्र विहीरीच तोंड बांधण्याकरीता नगर परिषदेकडे निधी नाही काय? एखाद्याचा जिव गेल्या नंतरच जाग येईल काय? असा प्रश्न परिसरातील नागरीकांना पडला आहे.

नगर परिषदेच्या अशा वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या दत्तवाडी चेअरी ले-आऊट मधील नागरिकांनी थेट खासदार अमर काळे, आमदार सुमीत वानखेडे यांना निवेदन देवुन पावसाळ्यापुर्वी विहीरीचे तोंड बांधण्याची तसदी घ्यावी अशी मागणी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button