शैक्षणीक

बारावीचा निकाल झाला जाहिर मुली ठरल्या अव्वल आणी नेहमी प्रमाणे मुले मात्र रेंगाळली, म्युनीसीपल कनिष्ठ महाविध्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९३.७९ टक्के तर, मॉडेल कनिष्ठ महाविध्यालयाचा ९८.७९टक्के, विविध शाखांचा निकाल समाधानकारक

आर्वी,दि.२:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी (ता.दोन) बारावीचा निकाल जाहिर केला असुन येथील म्युनिसीपल कनिष्ठ महाविध्यालयाच्या विज्ञान विभागाचा निकाल ९३.७९ टक्के लागला असुन मॉडेल कनिष्ठ महाविध्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९८.७९ टक्के तर,  कला, वाणिज्य व एमसीव्हीसी शाखाचा निकाल समाधानकारक लागला आहे. एकंदरीत पाहता मुली अव्वल ठरल्या असुन नेहमी प्रमाणे मुले मात्र रेंगाळली असल्याचे चित्र दिसुन येते.

  

  कु. अनुष्का मखीजा        कु. अनम काैसर        कु.आयशा नागोरी

येथील म्युनिसीपल कनिष्ठ महाविध्यालयातील विज्ञान शाखेच्या १२९ विध्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या एच.एस.सी ची परिक्षा दिली होती. या पैकी १२१ विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. माजी नगरसेवक श्रीचंद माखीजा यांची नातीन कु. अनुष्का प्रकाश माखीजा हिने ८०.५० टक्के गुण प्राप्त केले असुन विध्यालयामधुन प्रथम आली आहे. तर, कु. अनम कौसर मो. इम्तियाज अन्सारी हिने ७२.१७ टक्के व कु. आयेशा फारूक नागोरी हिने ६९.६७ टक्के गुण प्राप्त केले आहे.

तर दुसरीकडे, मॉडेल कनिष्ठ महाविध्यालयाच्या  विज्ञान शाखेचा निकाल ९८.७९ टक्के,  कला शाखेचा निकाल ८१.५५ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८६.५३ टक्के तर, एमसीव्हीसी शाखेचा निकाल ६० टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेतील सृष्टी महेंद्र बावणे हिने ७८ टक्के, कुणाली भीष्माचार्य लिचडे हिने ७७.१७ टक्के तर, इशिका किशन डाकोट हिने ७६ टक्के गुण प्राप्त केले आहे. कला शाखेतील समीक्षा दीपक मुडे ७४.६७ टक्के, पुर्वेश उमेश केणे याने ६९.१७ टक्के तर, राधिका विश्र्वंभर नेताम हिने ६८.३३ टक्के गुण प्राप्त केले आहे. वाणीज्य शाखेच्या तन्वी अरुण धानोरकर हिने ९० टक्के, प्रतीक्षा चंद्रकांत पाटील हिने ८१.१७ टक्के तर, सृष्टि दामोदरराव कोल्हे हिने ७७.६७ टक्के गुण प्राप्त केले आहे. किमान कौशल्यावर आधारित व्यवसायीक अभ्यासक्रम (एम.सी.व्ही.सी.) शाखेतील प्रतीक्षा रामचंद्र मारबते हिने ५८.५० टक्के, सोनाली सुनीलराव मेहरे हिने ५८.५० टक्के तर,किर्ती जितेंद्र इरपाचे हिने ५७.५० टक्के गुण प्राप्त केले आहे.

यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांचा खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, आमदार सुमीत वानखेडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव, तालुका प्रमुख स्वप्नील रननवरे, शहर प्रमुख धिरज लाड‍के, भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ॲड. शोभाताई काळे, सचीव संदिप काळे, प्राचार्य पी.ए.पावडे, नगराध्यक्षा सौ. स्वातीताई गुल्हाने, उपाध्यक्ष गौरवभाऊ जाजू, मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, प्राचार्य विश्वेश्वर पायले, पर्यवेक्षिका कु. ज्योती अजमिरे, प्रा. नितीन बोडखे, प्रा. विजय शेंडे, प्रा. प्रशांत जळीत आदिंनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button