आष्टीच्या तहसीलदारांनी पत्रकारांना केले दुर्लक्षीत महाराष्ट्र दिन कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रीके पासुन ठेवले वंचीत. पत्रकारांमध्ये उमटु लागले नाराजीचे सुर
आष्टी,दि.१:- मराठी भाषीक राज्याच्या स्थापनेची आठवण म्हणुन एक मे हा दिवस राज्यभर शासकीय स्तरावरावर साजरा केल्या जातो. या दिवशी महसुल विभागासह शासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहरण केल्या जाते या ध्वजारोहण कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रीका पत्रकारांना देणे अपेक्षीत आहे. मात्र आष्टी येथील तहसीलदार ऐश्र्वर्या गिरी यांनी याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करुन त्यांना वंचीत ठेवले असल्याने नाराजीचे तिव्र सुर उमटु लागले आहे.
एक मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा आणि संस्कृतीचा अभिमान साजरा करण्याचा दिवस आहे. ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’च्या नेतृत्वाखाली झालेल्या तीव्र आंदोलनानंतर आणि १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.
या दिवसाची आठवण म्हणुन सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केल्या जाते. हा दिवस महाराष्ट्र राज्याची संस्कृती, इतिहास, आणि मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या संघर्षाची आठवण करून देतो. हा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीकांकरीता महत्चाचा असुन या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात देशाचा चौथा स्तंभ म्हणुन गणल्यागेलेल्या पत्रकारांना सुध्दा सहभागी करुन घेणे क्रमप्राप्त ठरते मात्र आष्टीच्या तहसीलदार ऐश्र्वर्या गिरी यांनी त्यांना वंचीत ठेवले आहे. ही फार गंभीर बाब आहे.
तहसीलदार ऐश्र्वर्या गिरी यांनी आष्टी तहसीलचा पदभार घेवुन जेमतेम एक वर्ष झाला नाही. मात्र, या दरम्यान अनेक तक्रारी वाढल्या आहेत. अवैध्य खनीज उत्खणन, रेतीची मोठ्या प्रमाणात होणारी चोरी, तलाठ्यांना मुख्यालयीन न राहण्याची दिलेली मुभा, परिणामी शेतकऱ्यांची होणारी हेळसांड आदि अनेक प्रकारच्या तक्रारी असतांना, आता त्यांनी पत्रकारांची सुध्दा नाराजी ओढवून घेतली असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असुन या बाबत स्पष्टीकरण मागणे अपेक्षीत आहे.

