समारंभ

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना “भारत रत्न” देवून सन्मानीत करा. खासदार अमर काळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी, वेळपडली तर संसदेत आवाज उठवीणार.

आर्वी,दि.४:- ग्रामगीतेच्या माध्यमातुन मानव धर्माच प्रशिक्षण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाच सर्वौच्च नागरी सन्मान “ भारत रत्न” प्रदान करण्यात यावा अशी मागणी वर्धा लोकसभा खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहुन केली असल्याची माहिती देवुन याकरीता मी संसदेमध्ये सातत्याने आवाज उठवीत राहणार अशी ठाम भुमीका नुकत्याच परतोडी येथे झालेल्या जन्मोत्सव सोहळ्यात मांडली.

ग्राम गितेच्या माध्यमातुन ग्रामीण विकासाचे सुत्र सांगतांनाच त्यांनी शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना स्वच्छेतेचे, एकतेचे, मानवधर्माचे शिक्षण तर दिलेच, याशिवाय भजन, किर्तनाच्या माध्यमातुन समाज प्रबोधनाचे कार्य सुध्दा केले आहे. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्यावेळी त्यांच्या प्रबोधनाने आष्टी व चिमुर येथे मोठी क्रांती झाली हे विसरता येणार नाही. त्यांच्या किर्तनामधुन सामान्य माणसाच्या मनात ब्रिटीश साम्राज्या विरुध्द पेटवील्या गेलेल्या ज्वालामुळे देशात मोठी क्रांती घडली. अशा या महान क्रांतीकार विचाराची पेरणी करणारे तुकडोजी महाराज राष्ट्रसंत झाले आणी त्यांच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या भूमीवर आपण राहत आहो हे आपले भाग्य आहे.

त्यांच्या विचारांची पूजा केवळ शब्दात व्हायला नको, तर कृतीतून व्हायला पाहिजे असे आवाहन यावेळी करुन समाज सेवेकरीता वाहुन घेणाऱ्या महान विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना “भारत रत्न” देवुन त्यांच्या कार्याचा गौरव तर करण्यात यावाच शिवाय त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवीण्या करीता शासकीय स्तरावर प्रयत्न व्हावे अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली.

या पुढे जावुन त्यांनी, जो पर्यंत या मागणीची दखल घेतल्या जाणार नाही, तो पर्यंत संसदेमध्ये सातत्याने पाठपुरवा करण्यात येईल असा ही निर्धार व्यक्त केला. ज्या भूमीवर राष्ट्रसंतांनी वास्तव्य केले, त्या भूमीत आपण राहतो, हेच आपले भाग्य आहे. त्यांच्या विचारांची पूजा केवळ शब्दांत नको, तर कृतीतून व्हायला हवी, असे सांगत त्यांनी राष्ट्रसंतांच्या कार्याचा गौरव केला.

त्यांच्या या मागणीच्या समर्थनार्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अनुयायीच नाही तर, त्यांच्या विचाराने प्रेरीत झालेला प्रत्येक माणुस एक जुट होत असुन अमरावती, वर्धा, चंद्रपुर, चिमुर, उमरेड आदि परिसरातुन मोठ्या प्रमाणात मागणीला पाठींबा मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button