शासकीय उपक्रम

वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा उपक्रम, मॉडेल हायस्कुल देऊरवाडाने पटकावीला प्रथम पुरस्कार, वर्धा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण

आर्वी,दि.४:- वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने ‍जिल्ह्यात स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रम राबवील्या जाते. यात मॉडेल हायस्कुल देऊरवाडाच्या विध्यार्थ्यांनी चांगली कामगीरी बजावुन प्रथम क्रमांक पटकावीला. त्यांना महाराष्ट्र दिनी आयोजीत शासकीय कार्यक्रमात वर्धा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

विध्यार्थ्यांना शालेय जिवना पासुनच पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीची प्राथमीक माहिती मिळावी याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रम राबवील्या जातो. या उपक्रमा अंतर्गत स्थानिक पोलीस स्टेशन व पोलीस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने वर्षभर विविध उपक्रम राबवुन विध्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्याचा प्रयत्न केल्या जातो.  यातुन चांगली कामगीरी बजावणाऱ्या विध्यार्थ्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मान केल्या जाते.

  या उपक्रमात देऊरवाडा येथील मॉडेल हायस्कुलच्या विध्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरीची दखल घेवुन त्यांना जिल्ह्यातील प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरवीले तर, चांगली कामगीरी बजावणाऱ्या तन्मय दाभाडे व हर्षद बोरवार या विध्यार्थ्यांना वर्धा‍ जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते प्रमाण पत्र देवुन सत्कार करण्यात आला. पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक प्रफुलकुमार ठाकरे यांनी स्वीकारले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, ए.एस.आय. रियाज खान, हर्षद बोरवार आदि उपस्थीत होते.

या यशा बद्दल भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ॲड . शोभाताई काळे, सचिव संदिप काळे, शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विध्यार्थ्यांचे आदिंनी अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील शाळेच्या विध्यार्थ्यांनी चांगली कामगीरी बजावुन जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार मिळुन देवुरवाडा गावाच्या इतीहासात मानाचा मुजरा रोवल्यामुळे सर्वस्तरावरुन कौतुक केल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button